‘सामाजिक कार्यकर्ता’ प्रशिक्षण वर्गाची सांगता
५२ विषयांचे सखोल मार्गदर्शन; तज्ज्ञ मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र वितरण
कल्याण, ता. २६ (वार्ताहर) : समाजकार्याची आवड असलेल्या व्यक्तींना घडवण्यासाठी आणि सामाजिक क्षेत्रात कार्यक्षम कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी संकल्प संस्थेच्या वतीने आयोजित १९ आठवड्यांच्या प्रशिक्षण वर्गाचा सांगता सोहळा नुकताच पार पडला. नेहरू नगर येथील पंत वालावलकर स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात हा प्रमाणपत्र वितरण सोहळा झाला.
गेल्या १९ आठवड्यांपासून सुरू असलेल्या या उपक्रमात प्रशिक्षणार्थींना समाजकार्यातील विविध पैलूंचे शिक्षण देण्यात आले. यामध्ये समाजकार्याचे महत्त्व, नेतृत्व गुण, संवाद कौशल्य, गटकार्य आणि प्रचार-प्रसिद्धी माध्यमे यांसारख्या ५२ महत्त्वाच्या विषयांवर ३५ तज्ज्ञ मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले. केवळ पुस्तकी ज्ञान न देता, प्रशिक्षणाचा भाग म्हणून विविध सामाजिक संस्था, संघटना आणि शासकीय कार्यालयांना प्रत्यक्ष शैक्षणिक भेटी देण्यात आल्या.
दोनदिवसीय निवासी शिबिराद्वारे व्यक्तिमत्त्व विकास आणि स्वयं-परिचय यावर विशेष भर देण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून के. जे. सोमय्या हॉस्पिटलच्या वरिष्ठ वैद्यकीय समाज विकास अधिकारी गायत्री सज्जन उपस्थित होत्या. तसेच विशेष अतिथी म्हणून अभिनेत्री व मॉडेल युगंधरा कोळी, अखिल चित्रपट महामंडळ सदस्या व कथ्थक नृत्यांगना गौरी राव, मैत्री संस्थेचे अध्यक्ष सूरज भोईर यांची उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रे प्रदान करून गौरवण्यात आले.
यशस्वी आयोजन
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश पाटील आणि रेश्मा जगताप यांनी अत्यंत ओघवत्या शैलीत केले. सामाजिक प्रश्नांची जाण असलेला सुजाण कार्यकर्ता घडवण्याच्या दृष्टीने संकल्प संस्थेचा हा उपक्रम मैलाचा दगड ठरला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.