मुंबई

राज्याभिषेक समारोह संस्था यांचा शिवचरित्र प्रसाराचा संकल्प

CD

राज्याभिषेक समारोह संस्था यांचा शिवचरित्र प्रसाराचा संकल्प
ठाणे, ता. २६ (बातमीदार) : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास, विचार आणि कार्याची ओळख नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी राज्याभिषेक समारोह संस्था यांच्या वतीने महिनाभर विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. इतिहासाचे जतन आणि शिवचरित्राचा व्यापक प्रसार हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे.
संस्थेच्या वतीने गेली अनेक वर्षे सांस्कृतिक, शैक्षणिक आणि वैचारिक कार्यक्रम राबवले जात असून, तरुण पिढीमध्ये स्वराज्य, शौर्य, प्रशासन कौशल्य आणि राष्ट्रभक्ती या मूल्यांची जाणीव निर्माण करण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला जात आहे. बदलत्या काळात इतिहासाकडे सखोल आणि अभ्यासपूर्ण दृष्टिकोनातून पाहण्याची गरज लक्षात घेऊन व्याख्याने, स्पर्धा आणि मार्गदर्शन सत्रांचे आयोजन दरवर्षी करण्यात येते.
यंदा ‘तारीख ते तिथी रोज आमच्यासाठी शिवजयंती’ या उपक्रमांतर्गत १८ मार्चपर्यंत शिवचरित्र दर्शनाशी संबंधित माहितीपत्रक सर्वांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे. तसेच, विद्यार्थ्यांसाठी २९ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन वक्तृत्व आणि पोवाडा स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ८ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे.
तरुणाईमध्ये शिवचरित्राचा प्रभाव वाढावा यासाठी संस्थेचे कार्यकर्ते शाळा व महाविद्यालयांना भेट देऊन ‘शिवचरित्रातून आपण काय शिकावे’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय ‘शिवरायांचे आठवावे रूप’, ‘शिवरायांचा आठवावा प्रताप’ आणि ‘शिवरायांचा आठवावा साक्षेप’ या विषयांवर ६ ते ८ मार्चदरम्यान सायंकाळी ६.३० वाजता श्रीराम व्यायामशाळा येथे तीनदिवसीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India GDP: महत्त्वाची बातमी! १० वर्षांचा नियम संपला; देशाच्या महसूल गणनेत मोठा बदल, नवे सूत्र कधीपासून लागू होणार?

Rohit Sharma: चाहत्याने त्याच्या मुलीचे नाव समायरा ठेवले, रोहितला जेव्हा हे समजले, तेव्हा... VIDEO VIRAL

Latest Marathi News Live Update : अहिल्यानगरच्या नगर–मनमाड महामार्गावर भीषण अपघात; ४ ते ५ जण गंभीर जखमी

MLA Amol Mitkari : अजितदादांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार सुरू करा; आमदार अमोल मिटकरी यांची अधिवेशनात मागणी

DGCA New Rules : विमान प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी!, ‘डीजीसीए’ने आता बदलले नियम

SCROLL FOR NEXT