मुंबई

‘एंजल लेडीज सर्व्हिस बार’वर पोलिसांचा छापा

CD

उल्हासनगर, ता. २६ (वार्ताहर) : उल्हासनगर ४ परिसरातील विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कायदा व नैतिकतेला थेट आव्हान देणारा गंभीर प्रकार समोर आला आहे. २५ फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास पोलिसांनी श्रीराम चौक परिसरातील एंजल लेडीज सर्व्हिस बारवर छापा टाकला असता, बारमध्ये सुरू असलेले चित्र धक्कादायक होते. विहीत वेळेपेक्षा अधिक काळ सुरू ठेवलेल्या बारमध्ये खुलेआम अश्लील नृत्य सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक पोलिस आयुक्त अमोल कोळी, वरिष्ठ निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला. यावेळी मोकळ्या जागेत दहा महिला तोकडे कपडे परिधान करून अश्लील हावभाव करत ग्राहकांसमोर गाण्यावर नृत्य करत होते. पोलिस तपासानुसार, बार व्यवस्थापक रफीककुल्ला शेख याने आर्थिक फायद्यासाठी बारमधील कर्मचारी आणि महिला वेटर यांच्याशी संगनमत करून हा प्रकार सुरू ठेवल्याचा आरोप आहे. या बेकायदा कृत्यांमुळे परिसरातील सामाजिक वातावरण बिघडत आहे. तरुण पिढीवरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून बार व्यवस्थापक, वेटर आणि महिला अशा एकूण १५ जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

IAS Officers Transfers: महाराष्ट्रात पुन्हा मोठी प्रशासकीय उलथापालथ! ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी खळबळ, कोण कुठे गेलं?

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: इस्लामाबादमधील तिढ्यानंतर पाकिस्तानी लष्करप्रमुख मुनीर तेहरानमध्ये दाखल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

SCROLL FOR NEXT