मुंबई

पनवेलमध्ये ‘एक दिवसीय समाधान शिबिर’

CD

पनवेल, ता. २८ (बातमीदार) : महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार पनवेल तालुक्यात नागरिकांच्या शासकीय कामांचा त्वरित निपटारा करण्यासाठी एकदिवसीय समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती अपर तहसीलदार, पनवेल कार्यालयाने दिली आहे. या शिबिरांमधून नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती अपर तहसीलदार जितेंद्र इंगळे यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या या समाधान शिबिरांमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारच्या निर्णयानुसार नागरिकांना विविध दाखले, अर्ज व तक्रारींचे निवारण तसेच प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. तालुक्यातील मंडळस्तरावर मार्च व एप्रिलमध्ये शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच मेमध्ये नगर परिषद व नगर पंचायत स्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरांमध्ये फेरफार प्रकरणे निकाली काढणे, अभिलेख दुरुस्ती, उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्रांसाठी अर्ज स्वीकारणे व प्रमाणपत्र वितरण, तसेच तक्रार निवारण आदी सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय पीक नोंदणी, ई-मोजणी, पीएम किसान योजना, अँटीरेक, तसेच ईझ ऑफ डुइंग बिझनेससंदर्भातील सुविधा देण्यात येणार आहेत.

मंडळस्तरीय समाधान शिबिरे
तारीख ठिकाण
७ मार्च नेरे
१४ मार्च मोर्वे
१० एप्रिल कर्नाळा
१७ एप्रिल दापोली
२४ एप्रिल पांजे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांनो सावधान! होळीसाठी झाडे कापलीत तर १ लाखांचा दंड अन् कायदेशीर कारवाई होणार; नेमका कुणी दिला इशारा?

Navi Mumbai: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! नवी मुंबई विमानतळावरून ६ शहरांसाठी इंडिगो उड्डाणे सुरू करणार, कोणत्या आणि कधीपासून?

Rohit Shetty Shooting : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात खळबळजनक वळण; नेपाळ कनेक्शन उघड

घरांच्या किमती वाढण्यात नागपूर आघाडीवर; मुंबई-पुण्यालाही टाकलं मागे, या वर्षात तब्बल 'इतक्या' कोटींच्या उलाढालीची शक्यता

Gold Rate: मोठी बातमी! सोन्याच्या किमती २३ हजारांनी वाढण्याची शक्यता; अमेरिका आणि इराण युद्धाचा परिणाम कसा होणार?

SCROLL FOR NEXT