रायगड जिल्हा भोई समाज सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी राजेश शिर्के
रोहा, ता. २५ (बातमीदार) : रायगड जिल्हा भोई समाज सेवा संस्थेची वार्षिक सभा भातसई येथे संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दगडू शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. या सभेत नव्या कार्यकारिणीची निवड एकमताने करण्यात आली. गोवे गावचे रहिवासी राजेश दत्ताराम शिर्के यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
उपाध्यक्षपदी अनिल सारंगे, चिटणीस अरविंद महाडिक, उपचिटणीस महेंद्र शिर्के, खजिनदार दत्तात्रेय जाधव, उपखजिनदार विजय तरे, हिशोब तपासनीस दिपक जाधव यांची निवड झाली. तसेच विविध पदांवर सदस्यांचीही एकमताने निवड करण्यात आली. नवनिर्वाचित कार्यकारिणीचे समाजबांधवांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आदर्शगाव भातसई ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.
फोटो कॅप्शन : जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राजेश शिर्के यांचे समाजबांधवांकडून अभिनंदन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.