मुंबई

मेहेंदळे हायस्कूलमध्ये विविध स्पर्धा व समूहगीत

CD

मेहेंदळे हायस्कूलमध्ये विविध स्पर्धा व समूहगीत
रोहा, ता. २६ (बातमीदार) : श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘हिंद की चादर’ उपक्रमांतर्गत कोएसो मेहेंदळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
प्राचार्य रमेश मोसे यांच्या मार्गदर्शनाखाली १६ फेब्रुवारी रोजी निबंध, वकृत्व, चित्रकला, गीतगायन व घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत गुरु तेग बहादुर यांच्या जीवनकार्याला अभिवादन केले. २३ फेब्रुवारी रोजी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी मेघना धायगुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी पंजाबी पार्श्वगायक सतिंदर सरताज यांनी गायलेल्या गीताचे सामूहिक सादरीकरण केले.
धर्मरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या गुरु तेग बहादुर यांच्या विचारांचा प्रसार विद्यार्थ्यांपर्यंत व्हावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून कार्यक्रमाचे नियोजन नारायण पानसरे, के.आर. पाटील, संग्राम गायकवाड, संदीप चांदोरकर, विशाल सोनकर, परशुराम परिहार व सुनिल कोकळे यांनी केले.
चौकट
मूल्यसंस्कारांचा वारसा :
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रेम, सहिष्णुता, धर्मनिरपेक्षता आणि मानवतेचे मूल्य समजण्यास मदत झाली. स्पर्धा, समूहगीत आणि माहितीपर उपक्रमांमधून गुरु तेग बहादुर यांच्या बलिदानाची प्रेरणा तर मिळालीच, शिवाय विविध कला प्रकारांतून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास व सहभागही वाढला.

फोटोओळ : मेहेंदळे हायस्कूलमध्ये ‘हिंद की चादर’ समूहगीत प्रसंगी गटशिक्षणाधिकारी मेघना धायगुडे व चित्रकला स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांसमवेत शिक्षक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: आफ्रिकेच्या विजयाने टीम इंडियाचा भार हलका केला! झिम्बाब्वेविरुद्ध संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करून उतरला

Baramati News : बारामती नगरपरिषदेच्या पहिल्याच बैठकीत नगरसेवक आक्रमक...

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांनी स्वीकारली राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी

Pachod Theft : चोरट्यांनी बनविले शेतकऱ्यांना 'लक्ष्य'! पाणी असूनही पिकांची होरपळ; दोनशेवर शेतकऱ्यांच्या विद्यूत पंपाचे केबल रात्रीतून लंपास

T20 WC, SA vs WI: दक्षिण आफ्रिकेचे सेमीफायनलच्या दिशेने पाऊल; वेस्ट इंडिजला हरवून भारतासाठीही उघडलीत दारं

SCROLL FOR NEXT