मुंबई

नेरूळ गावातील रस्त्यांवर गटाराचे पाणी

CD

नेरूळ गावातील रस्त्यांवर गटाराचे पाणी
आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
जुईनगर, ता. २६ (बातमीदार) : नवी मुंबईतील नेरूळ गाव सेक्टर २० परिसरात कलश संकल्प टॉवर मागील तसेच स्वामी समर्थ कृपा इमारतीसमोरील गटारातील सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक दिवसांपासून ही समस्या अधूनमधून उद्भवत असून, प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
अंतर्गत रस्त्यांवर साचलेल्या घाण पाण्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, नागरिकांना याच पाण्यातून ये-जा करावी लागत आहे. परिणामी डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे मलेरिया, डेंगी, चिकुनगुनिया आदी साथींचा धोका वाढल्याची भीती व्यक्त केली जात आहे. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.
महापालिकेकडून या समस्येवर केवळ तात्पुरते उपाय केले जातात; मात्र गटार व्यवस्थेची कायमस्वरूपी दुरुस्ती होत नसल्याने ही परिस्थिती वारंवार निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पावसाळ्यात तर परिस्थिती अधिक बिकट बनते आणि रस्त्यावरून चालणेही कठीण होते. घाण पाण्यातून चालत घरी जाण्यामुळे आजारांचा धोका वाढत असल्याची तक्रार पालकांकडून करण्यात येत आहे.
स्वच्छतेअभावी परिसरात वावरणे कठीण झाले असून, महापालिकेने तातडीने गटार व्यवस्था सुरळीत करून रस्त्यांवरील सांडपाणी थांबवावे. तसेच नियमित स्वच्छता मोहीम राबवून जंतुनाशक फवारणी करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

चौकट
कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी
वारंवार उद्भवणारी ही समस्या लक्षात घेऊन गटार लाइनची संपूर्ण दुरुस्ती करून सांडपाण्याचा निचरा सुरळीत करावा, तसेच आरोग्य विभागाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India GDP: महत्त्वाची बातमी! १० वर्षांचा नियम संपला; देशाच्या महसूल गणनेत मोठा बदल, नवे सूत्र कधीपासून लागू होणार?

Rohit Sharma: चाहत्याने त्याच्या मुलीचे नाव समायरा ठेवले, रोहितला जेव्हा हे समजले, तेव्हा... VIDEO VIRAL

Latest Marathi News Live Update : धुळे–सुरत महामार्गावर मोठी दुर्घटना; गॅस टँकरला भीषण आग

MLA Amol Mitkari : अजितदादांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार सुरू करा; आमदार अमोल मिटकरी यांची अधिवेशनात मागणी

DGCA New Rules : विमान प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी!, ‘डीजीसीए’ने आता बदलले नियम

SCROLL FOR NEXT