मुंबई

सॅटेलाइट टॅगसह ‘धवललक्ष्मी’चे समुद्रात पुनर्वसन

CD

सॅटेलाइट टॅगसह ‘धवललक्ष्मी’चे समुद्रात पुनर्वसन
ओमानजवळील मासीराह बेट परिसरात पोहोचले

कासा, ता. २६ (बातमीदार) : सॅटेलाइट टॅग बसवून उपचारानंतर समुद्रात सोडण्यात आलेले ऑलिव्ह रिडले प्रजातीचे मादी सागरी कासव ‘धवललक्ष्मी’ नूकतेच ओमानमधील प्रसिद्ध मासीराह बेट परिसरात पोहोचले आहे. उत्तर हिंद महासागरातील धोक्यात आलेल्या लॉगरहेड कासवांच्या महत्त्वाच्या घरट्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या बेटापासून सुमारे १६० किलोमीटर पूर्वेस धवललक्ष्मीचा प्रवास नोंदवला जात आहे. या कासवाने ९८ दिवसांत तब्बल १,७०० किलोमीटर प्रवास केल्याचे सांगितले जात आहे.
१० ऑगस्ट रोजी धाकटी डहाणू किनाऱ्यावर ‘धवललक्ष्मी’ कासव जखमी अवस्थेत आढळल्यानंतर तिला कासव संक्रमण व उपचार केंद्रात दाखल करण्यात आले होते. तब्बल तीन महिने डॉ. दिनेश विन्हेरकर, डॉ. जान्हवी यांच्यासह प्राणीरक्षक प्रतीक वाहूरवाघ, रेमंड डिसोझा आणि वाइल्डलाइफ कंझर्वेशन अँड एनिमल वेल्फेअर असोसिएशनच्या टीमने उपचार केले. धाकटी डहाणू खाडीतून सुमारे सहा नॉटिकल मैलांवर मासेमारी बोटीतून वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत धवललक्ष्मीला समुद्रात सोडण्यात आले. या वेळी अप्पर प्रधान मुख्य वनरक्षक एस. व्ही. रामराव, डहाणूचे उपवनसंरक्षक निरंजन दिवाकर, मुंबई कांदळवन कक्षाच्या उपवनसंरक्षक मधूमिथा एस., उपवनसंरक्षक खाडे, सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री, पालघरचे पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, सहाय्यक उपवनसंरक्षक प्रियंका पाटील व वन परिक्षेत्र अधिकारी नवीन माच्छी उपस्थित होते. या कासवाचे नामकरण मानद वन्यजीव रक्षक स्व. धवल कंसारा यांच्या स्मरणार्थ ‘धवललक्ष्मी’ असे करण्यात आले, अशी माहिती मानद वन्यजीव रक्षक हार्दिक सोनी यांनी दिली.

पुढील एक वर्ष प्रवासाचा अभ्यास
धवललक्ष्मीवर सॅटेलाइट टॅग वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मोहित मुदलियार आणि निधी म्हात्रे यांनी बसवला आहे. कासव श्वासासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर येते तेव्हा सेन्सरच्या माध्यमातून तिचे लोकेशन मिळणार असून, पुढील एक वर्ष तिच्या सागरी प्रवासाचा अभ्यास केला जाणार आहे. ही माहिती ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. २०१३ मध्ये स्थापन झालेल्या डहाणू कासव उपचार केंद्रात मुंबई, रायगड, ठाणे, पालघर तसेच गुजरात किनाऱ्यावरून येणाऱ्या जखमी कासवांवर दरवर्षी उपचार केले जात असल्याचेही सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT