मुंबई

मराठीतील अभियांत्रिकीकडे वाढता कल!

CD

मराठीतील अभियांत्रिकीकडे वाढता कल!
तंत्र संचालनालयाचे पदविका अभ्यासक्रम

मुंबई, ता. २६ ः मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर तंत्रशिक्षण विभागाने अभियांत्रिकीच्या पदविकेचे इंग्रजीसोबतच मराठी भाषेतून शिक्षण उपलब्ध करून दिल्याने हे शिक्षण राज्यातील विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरत आहे. यामुळे मागील काही वर्षांमध्ये अभियांत्रिकीच्या पदविका अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात कल वाढला आहे.
राज्यात येत्या काळात तंत्र संचालनालयाचे मराठी भाषेतील अनुवादित अभ्यासक्रमांचे हे प्रयत्न मराठी भाषेसाठी मोठे वरदान ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारामुळे आणि तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहीतकर यांनी केलेल्या प्रभावी नियोजनामुळे हे अभ्यासक्रम प्रबळपणे राबवले जात आहेत. एकूण १५४ विषयांची शैक्षणिक सामग्री, सत्रनिहाय टप्प्याटप्प्याने तयार करून, मंडळाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांकरिता निःशुल्क उपलब्ध करून ‍दिली.
...
अशी केली सामग्री विकसित
सामग्री विकसित करण्याकरिता राज्यातील अनुभवी व तज्ज्ञ अध्यापकांनी व्यावहारिक मराठी भाषा व इंग्रजी भाषेतील तांत्रिक शब्दावलीचा वापर करून, मराठी, इंग्रजी भाषेचा सुवर्णमध्य साधण्यात आला. समीक्षक व औद्योगिक तज्ज्ञांमार्फत या सामग्रीची पडताळणी करण्यात आली. तयार केलेल्या शैक्षणिक सामग्रीचा दर्जा व तसेच इतर बाबींची खात्री, मंडळाच्या स्तरावर स्थापन केलेल्या सुकाणू समितीमार्फत करण्यात आली.
...
द्विभाषिक शिक्षणाचा प्रवास
१. २०२३-२४ मध्ये ३८८ संस्थांपैकी १७५ संस्थांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मराठी-इंग्रजी (द्विभाषिक) मधून शिक्षणाची संधी दिली. यात ८६,४६५ विद्यार्थ्यांपैकी ३४,६४७ म्हणजेच ४० टक्के विद्यार्थी हे मराठी-इंग्रजी (द्विभाषिक) माध्यमामध्ये प्रवेशित झाले.
२. २०२४-२५ मध्ये ४०० संस्थांपैकी १८५ संस्थांनी प्रथम वर्षात एकूण प्रवेशित ९५,५११ विद्यार्थ्यांपैकी ३९,६८९ म्हणजेच ४१ टक्के विद्यार्थी द्विभाषिकमध्ये प्रवेशित झाले.
३. २०२५-२६ मध्ये ४१६ संस्थांपैकी १९२ संस्थांनी प्रथम वर्षात एकूण प्रवेशित १,०७,९१० विद्यार्थ्यांपैकी ४५,४४४ म्हणजेच ४२ टक्के विद्यार्थ्यांनी द्विभाषिक माध्यमाचा पर्याय स्वीकारला.
...
ही पुस्तके मराठीत
मेकॅनिकल इंजिनिअरिंग ग्रुप, सिव्हिल इंजिनिअरिंग ग्रुप, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ग्रुप, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग ग्रुप, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ग्रुप, केमिकल इंजिनिअरिंग आदी पुस्तके आणि त्यासाठीची सामग्री ही मराठीतून उपलब्ध करून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT