मुंबई

कुत्रा चावल्याने सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू

CD

कुत्रा चावल्याने सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू
भटक्या मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर

कल्याण, ता. २७ (वार्ताहर) : आंबिवलीजवळील गाळेगाव आदिवासी पाडा परिसरात भटक्या मोकाट कुत्र्याने सात वर्षांच्या मुलाला चावा घेतल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली. या घटनेमुळे केडीएमसी क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. घटनेची गंभीर दखल घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका तेजश्री गायकवाड यांनी कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयात धाव घेत आयुक्त व महापौरांची भेट घेतली.

यापूर्वी भटक्या कुत्र्याने चावल्यानंतर रेबीजची भीती वाटल्याने कल्याण पूर्वेतील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच मोहने गाळेगाव येथील खुशील शंकर वाघे या मुलाचा मृत्यू झाला. खुशीलच्या गालाचा लचका कुत्र्याने तोडला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच वेळी दुसऱ्या एका मुलालाही कुत्र्याने चावा घेतला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सामाजिक कार्यकर्ते हेमंत गायकवाड यांनीही ठोस धोरण राबवण्याची आवश्यकता व्यक्त केली. चिकन-मटण विक्रेत्यांकडील टाकाऊ कचऱ्यामुळे कुत्रे हिंस्र होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT