मुंबई

मुंबईत १०० टक्के मलनिसारण व्यवस्था

CD

मुंबईत १०० टक्के मलनिस्सारण व्यवस्था
महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा संकल्प
मुंबई, ता. २७ ः झपाट्याने विस्तारलेल्या उपनगरात मोठ्या प्रमाणात झोपड्या वाढल्या आहेत. गेल्या काही वर्षांत पुनर्विकास प्रकल्प सुरू आहेत. झोपड्या असलेल्या भागात मलनिस्सारणाची व्यवस्था नाही; मात्र आता मुंबईच्या शहर आणि उपनगरातील नागरिकांना १०० टक्के मलनिस्सारण व्यवस्था देण्याचा संकल्प पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी व्यक्त केला आहे.
मुंबईच्या नागरिकांना १०० टक्के नागरिकांना मलनिस्सारणाची सुविधा देण्यास बांधील असल्याची ग्वाही पालिकेचा अर्थसंकल्प सादर करताना पालिका आयुक्त गगराणी यांनी दिले. ते पुढे म्हणाले, की २०८० किमी लांबीचे मलनिस्सारणाचे जाळे कार्यान्वित आहे. त्याद्वारे मुंबईच्या एकूण ८१.२४ टक्के लोकसंख्येला ८५.७४ टक्के क्षेत्रफळाला मलनिस्सारण सुविधा पुरविली जाते.

कामे वेगाने सुरू करणार
मुंबई मलनिस्सारण सुधारणा कार्यक्रमांतर्गत टप्पा एकमध्ये सध्या ५.८२३ किमी लांबीची कामे प्रगतिपथावर आहेत. ४.७७५ किमी लांबीची कामे लवकरच सुरुवात केली जाईल, असे पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले. टप्पा दोनमधील १४३.१९ किमी लांबीच्या मलनिस्सारण वाहिन्यांपैकी २८.६०६ किमी लांबीच्या वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. तसेच ४९.४५१ किमी लांबीची कामे प्रगतिपथाबर आहेत. उर्वरित कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून ती कामे वेगाने सुरू करण्यात येतील, अशी माहिती पालिका आयुक्तांनी दिली.
--------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT