मुंबई

मध्य रेल्वेच्या टीसीचा करंटेपणा:  पोलीस होण्याचे स्वप्न धोक्यात

CD

पोलिस होण्याचे तरुणाचे स्वप्न धोक्यात!
रेल्वेचे तिकीट नसल्याने टीसीने पकडल्यानंतर धावपळीत जखमी

नितीन बिनेकर, सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून गावाकडून मुंबईत भरतीसाठी आलेल्या  सुयेश  तांबे या बेरोजगार तरुणाचे स्वप्न मध्य रेल्वेच्या टीसीच्या निष्काळजीमुळे धोक्यात आले आहे. ग्रामीण भागातून आलेला सुयेश लोकलने सीएसएमटी येथे उतरला. मात्र, तिकीट नसल्याने टीसीने त्याला ताब्यात घेऊन कार्यालयात नेण्यास सुरुवात केली. त्या वेळी फलाटावरून चालत जाण्याऐवजी टीसीने त्याला उभ्या असलेल्या एका लोकलमधून दुसऱ्या लोकलमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी अचानक लोकल सुरू झाल्याने घाईगडबडीत त्याला फलाटावर उतरवण्यात आले. यात तो पडून गंभीर जखमी झाला. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या पोलिस भरतीच्या परीक्षेला कसे सामोरे जावे, अशी खंत त्याने व्यक्त केली आहे.

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील सुयेश अंकुश तांबे (वय २१) हा तरुण पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून गेल्या काही वर्षांपासून भरतीची तयारी करत होता. शनिवारी होणाऱ्या मैदानी परीक्षेसाठी तो आपल्या काही मित्रांसह मुंबईत दाखल झाला. दादरहून लोकलने ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे पोहोचले. सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक ५ आणि ६ परिसरात तिकीट तपासणीदरम्यान संबंधित तरुणांकडे लोकलचे तिकीट नसल्याचे आढळले. त्यानंतर तिकीट तपासनीसांनी त्यांना दंड भरण्यास सांगितले. मात्र, तरुण टाळाटाळ करीत असल्याने त्याला प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील टीसी कार्यालयात नेण्यास सुरुवात करण्यात आली.

शॉर्टकटचा निर्णय ठरला जीवावर
कार्यालयात नेण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याने प्लॅटफॉर्मवरून जाण्याऐवजी प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर उभ्या असलेल्या लोकलमधून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर नेण्याचा शॉर्टकट निवडल्याचा आरोप आहे. दरम्यान, अचानक लोकल सुरू झाल्याने तरुणांमध्ये घबराट पसरली. घाईगडबडीत लोकलमधून उतरायला सांगितल्यावर सुयेश तांबे याचा तोल गेला आणि तो प्लॅटफॉर्मवर जोरात पडला. या अपघातात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. काही वर्षांपासून रोज धावणे, व्यायाम आणि कष्ट करून पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या सुयेशसमोर आता मोठे संकट उभे ठाकले आहे. उद्या मैदानी परीक्षा आहे. इतक्या वर्षांची तयारी एका क्षणात संपते की काय, ही भीती मनात आहे,” अशी व्यथा त्याने व्यक्त केली.

प्रवाशांचा संताप
घटनेनंतर स्थानक परिसरात उपस्थित असलेल्या प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यांच्या मते, विनातिकीट प्रवास करणे ही तरुणांची चूक असली तरी त्यांना चालत्या लोकलमधून उतरवणे किंवा अशा प्रकारे शॉर्टकट वापरणे हे अत्यंत धोकादायक आहे. एका क्षणाच्या निष्काळजीमुळे एका तरुणाच्या आयुष्यभराच्या स्वप्नावर पाणी फिरण्याची वेळ आली आहे, अशी भावना काही प्रवाशांनी व्यक्त केली. दरम्यान, घटनेनंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी जखमी सुयेशला तातडीने प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची सीएसएमटी स्थानक परिसरात जोरदार चर्चा सुरू असून, रेल्वे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
--
सीएसएमटी स्थानकात घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल. चौकशीत संबंधित कर्मचाऱ्याची निष्काळजी आढळल्यास त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. दरम्यान, पोलिस भरतीसाठी मुंबईत येणाऱ्या सर्व उमेदवारांना मध्य रेल्वेचे आवाहन आहे की, लोकल प्रवास करताना नियमांचे पालन करून वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा.
-डॉ. स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

Pratibha Dhanorkar Statement : ‘’मला ‘व्हिलन’ ठरवण्यामागे कुणाचं षडयंत्र, लवकरच भांडाफोड करणार'' ; प्रतिभा धानोरकरांचा सूचक इशारा!

T20 WC, IND vs WI: रिंकू सिंग IN, तिलक वर्मा OUT? वेस्ट इंडिजविरुद्धच्या अतिमहत्त्वाच्या सामन्यात भारताच्या Playing XI मध्ये बदल

Latest Marathi News Live Update: भूमरेंच्या चालकाकडून अंबादास दानवेंवर एक कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा

Mumbai: आधी पाठलाग, सेल्फीसाठी १५ मिनिटे त्रास अन्...; मुंबईत विदेशी महिला पर्यटकासोबत नको ते कृत्य, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT