काव्यमैफलीचे मराठीचे गुणगाण
वाणगाव, ता. २८ (बातमीदार) : चिंचणी-तारापूर शिक्षण संस्थेचे श्री पी.एल.श्रॉफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय, चिंचणी येथील राष्ट्रीय सेवा योजना आणि मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी ‘अभिजात मराठी भाषेची सद्यःस्थिती भवितव्य आणि तरुण पिढीची जबाबदारी’ या विषयांवर मुलाखत घेण्यात आली, तर काव्यमैफलीतून मराठीचे गुणगाण मांडले.
शेजुळे यांनी मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा उल्लेख करताना जागतिकीकरणाच्या युगात मराठीची उपयुक्तता अधोरेखित केली. तरुणांनी तंत्रज्ञानाचा वापर करून मराठीला नवे व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन केले. तसेच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रामुख्याने मराठी शाळा, मातृभाषेतील शिक्षण याचे महत्त्व समजून घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. मुलाखतीनंतर राष्ट्रीय सेवा योजना विभाग, मराठी विभाग आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने काव्यमैफल घेण्यात आली. या काव्यमैफलीत प्रवीण दवणे, प्रा. जनार्दन शिंदे, सुहास राऊत, प्रा. संजय घरत, प्रा. चारुशीला बहारे, स्टेला व्हिक्टर, षण्मुखी फाळके, डॉ. वनश्री फाळके, प्रा. जिज्ञा मोरे, प्रा. वैष्णवी दवणे, डॉ. ज्ञानेश्वर भोसले आणि श्री. प्रदीप फाळके आदी कवी-कवयित्रींनी आपल्या कवितांमधून मराठी भाषेचे सौंदर्य, सामाजिक भान प्रभावीपणे मांडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.