मुंबई

मराठी भाषेचा वसईत जयघोष

CD

मराठी भाषेचा वसईत जयघोष
कर्मवीर भाऊराव विद्यालयात मान्यवरांची उपस्थिती
विरार, ता.२८(बातमीदार)ः आपली भाषा टिकण्यासाठी घरातही मराठीतच बोलणे गरजेचे आहे. इंग्रजी जागतिक भाषा असली तरी मराठी मातृभाषा आहे. मोबाईलच्या युगात मुलांना वाचन, साहित्याकडे वळवायला हवे, असे मत डिम्पल पब्लिकेशनचे अशोक मुळे यांनी व्यक्त केले. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात मराठी भाषा दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या प्रांगणात मराठी अस्मितेचा महामेरू, कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. ज्ञानोपासनेच्या या सोहळ्यात मराठी भाषेच्या समृद्धतेचा आणि अभिमानाचा जयघोष झाला. कार्यक्रमाची सुरुवात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील आणि मराठी साहित्याचे उपासक कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. या कार्यक्रमासाठी डिंपल प्रकाशनचे संस्थापक अशोक मुळे, शिवछत्रपती समाजसेवा मंडळाचे सदस्य मिलिंद पाटील आणि विद्यालयाच्या स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील उपस्थित होते. यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय मराठी माध्यमातून शिकलेली मुले मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे इंग्रजीचा बाऊ करण्यापेक्षा माय मराठीला जपण्याचे, आवाहन पुरषोत्तम पाटील यांनी केले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी पोवाडा सादरीकरणातून शूरवीरांच्या पराक्रमाची गाथा, भक्तीचा साज चढलेली गवळणीमुळे वातावरण भक्तीमय झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पिंपरीत आंब्याच्या आमिषाने अडीच वर्षांच्या चिमुरडीला खोलीत बोलावून लैंगिक अत्याचार; ४७ वर्षीय आरोपीला अटक

G-Pay Pocket Money: Google Pay वर नवं ‘Pocket Money’ फीचर आलं! नेमकं काय आहे जाणून घ्या

झी मराठीवर नुकतीच सुरु झालेली दीप ज्योती आहे कन्नड मालिकेचा रिमेक ! अशी असेल पुढील कथा

Team India: 'गौतम गंभीरचे अनेक शत्रू, ५ सिलेक्टर्सपैकी ४ जणं....' माजी संघसहकाऱ्याचं खळबळजनक दावा

Latest Marathi News Live Update: अश्विनी चेनानीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

SCROLL FOR NEXT