मुंबई

आनंद, एकोप्याचे दर्शन

CD

आनंद, एकोप्याचे दर्शन
जव्हार परिसरात होळीनिमित्त उत्साह शिगेला
संदीप साळवे ः सकाळ वृत्तसेवा
जव्हार, ता. २८ ः सहाशे वर्षांचा ऐतिहासिक आदिवासी राजवटीचा वारसा लाभलेल्या जव्हार परिसरात आदिवासी संस्कृती, परंपरा आजही जपण्यात येते. येथील पारंपरिक होळी सणाला विशेष महत्त्व आहे. शेतकरी असो किंवा शेतमजूर, सर्व जण कुटुंबासह पिढ्यान्‌पिढ्या होळी हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करत असून, पाच दिवस चालणाऱ्या उत्सवातून आनंद, एकोप्याचे दर्शन घडते.
आदिवासी राजवटीचा वारसा लाभलेल्या जव्हार संस्थानने इतिहासात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. येथील सण-उत्सव हे केवळ धार्मिक नसून सामाजिक एकोप्याचे प्रतीक मानले जातात. परंपरागत पद्धतीने साजरी होणारी होळी आदिवासी जीवनपद्धती आणि संस्कृतीचे जिवंत दर्शन घडवणारी परंपरा असून, आधुनिक काळातही ग्रामस्थांनी जपली आहे. जव्हार परिसरातील पारंपरिक होळी आदिवासी संस्कृतीचा जिवंत वारसा असून, एकजुटीचे आणि परंपराप्रेमाचे सुंदर उदाहरण म्हणून पाहिली जाते. या सणाचे वैशिष्ट्य म्हणजे सणाच्या दिवसांत चिखल फेकणे, पाणी उडवणे किंवा रंग लावणे हा होळी सणाच्या परंपरेचे प्रतीक असल्याचे कुणीही रागवत नाही. उलट सर्वांनी आनंदाने सहभागी व्हावे, हा या परंपरेमागील भाव असतो. त्यामुळे या आदिवासी तालुक्यात गावागावांत होळीच्या काळात मोकळेपणा आणि आपुलकीचे वातावरण पाहायला मिळते.
-------------------------------
पोस्त मागण्याची प्रथा
- शहरांप्रमाणे या भागातही होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो; मात्र गावठी कोंबड्याचा नैवेद्य देण्याची परंपरा, लहान बालके लहान होईलपासून ते मोठ्या होळीपर्यंत दोन दिवस मुले असल्यास हातात साखरगाठी कडा, मुली हार परिधान करत होळीवर दाखल होत असतात.
- आजही ही पद्धत जपली जाते. होळीच्या पाचही दिवसांत लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण विविध सोंगे काढून आणि पारंपरिक वेशभूषा करून घरोघरी फिरतात. आपल्या कलेद्वारे पोस्त (पैसे किंवा अन्नधान्य) गोळा करण्याची प्रथा अजूनही टिकवून आहेत.
------------------------
रोजगारासाठी स्थलांतर
होळी सण आनंदात साजरा करता यावा, यासाठी जव्हार परिसरातील अनेक कुटुंबे दरवर्षी शहरांकडे स्थलांतर करतात. मुंबई, ठाणे, नाशिकसारख्या शहरांत कष्टाचे काम करून पैसे साठवतात. सण जवळ आला गावी परततात. कुटुंबासमवेत पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्याकडे त्यांची ओढ होते. त्यामुळे सणासाठी नवीन कपडे, त्याचबरोबर इतर काही आवश्यक खर्च भागवण्यासाठीचे कष्ट घेतले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

SCROLL FOR NEXT