मुंबई

धारावीतील मनसे तर्फे मराठी राजभाषा गुणगौरव दिन साजरा

CD

मनसेतर्फे मराठी दिनानिमित्त स्वाक्षरी मोहिम
धारावी, ता. २८ फेब्रुवारी (बातमीदार) : महाराष्ट्रात २७ फेब्रुवारी हा दिवस जागतिक मराठी राजभाषा गुणगौरव दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने अनेक कार्यक्रम अनेक संस्था-संघटना व राजकीय पक्षांच्या वतीने राबविण्यात येतात. मनसेच्या वतीने धारावीत शीव स्थानकाबाहेर मराठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. यावेळी स्थानकातील प्रवाशांनी आणि धारावीतील रहिवाशांनी मोहिमेत मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या आदेशाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मराठी स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आल्याचे कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक, शाखाध्यक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष जिगर मोरे यांनी सांगितले. मराठी माणसाने अभिमानाने आपले नाव व स्वाक्षरी मराठीतून करावी यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आल्याचे मोरे यांनी सांगितले.
कार्यक्रमात मनसेचे विभागाध्यक्ष राजेश सोनवणे, ठाकरे गटाच्या नगरसेविका हर्षला मोरे, शीव स्थानक प्रबंधक संजीव कुमार, मनसेचे उपविभाग अध्यक्ष कौशिक कोळी, दीपक खारवी, ठाकरे गटाचे शाखा प्रमुख सतीश कटके, आनंद भोसले आदी मान्यवर सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनसेचे तरुण कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्या यांनी मेहनत घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Special: संसदेचं अधिवेशन वादळी ठरणार! मतांची जुळवाजुळव करण्याचं आव्हान, केंद्र सरकार ३६० खासदारांचा पाठिंबा कसा मिळवणार?

Mahabaleshwar incident: प्राचीन कृष्णाबाई मंदिराच्या छताचा भाग कोसळला; महाबळेश्वरमधील पंचनद्यांचे उगमस्थान,'पुरातत्त्व'च्या दुर्लक्षपणामुळे नेमकं काय घडलं!

Summer Heat Increase : राज्य आता ‘रेड’झोनमध्ये; उष्णतेच्या लाटेचा प्रकोप वाढला

PNG Gas Connection : महिनाभरात १४ हजार जोडण्या; ‘पीएनजी’ बंधनकारक केल्याने मागणीत तिप्पट वाढ

IPL 2026 : वैभव सूर्यवंशी 'Orange Cap'च्या शर्यतीत पाचव्या स्थानावर फेकला गेला, पुढे चार स्टार फलंदाज; RCBच्या विजयाने इथेही उलटफेर

SCROLL FOR NEXT