मुंबई

महापेतील हत्येचे गूढ ४८ तासांत उकलले

CD

नवी मुंबई, ता. २८ (वार्ताहर) : महापे एमआयडीसी परिसरातील नाल्याशेजारी सापडलेल्या तरुणाच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात नवी मुंबई गुन्हे शाखेला यश आले आहे. विजेच्या खांबावरील वायर चोरी केल्याच्या संशयावरून एका ३१ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करून त्याची हत्या करणाऱ्या चौकडीला पोलिसांनी ४८ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. ‘फोन-पे’वर झालेले पैशांचे व्यवहार आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या हत्येचा छडा लावला.

मानखुर्द येथे राहणारा संदीप लक्ष्मीकांत विश्वकर्मा हा तरुण १५ फेब्रुवारीपासून बेपत्ता होता. १६ फेब्रुवारी रोजी महापे येथील एका नाल्याशेजारी त्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. सुरुवातीला हा आकस्मिक मृत्यू वाटत असला, तरी शवविच्छेदन अहवालात संदीपच्या अंगावर गंभीर जखमा आणि अंतर्गत मारहाण झाल्याचे समोर आले. या अहवालामुळे रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला. गुन्हे शाखा कक्ष-१ ने या प्रकरणाचा समांतर तपास हाती घेतला. तपासादरम्यान पोलिसांना संदीपचे शेवटचे ठिकाण वाशी परिसरात आढळले. संदीपने वाशी सेक्टर-२६ मधील एका भंगार व्यावसायिकाशी संपर्क साधल्याचे समोर आले. त्याच्या चौकशीत काही तरुणांनी त्याला आणि संदीपला जबरदस्तीने महापे येथील एका गोदामात नेले होते.

‘फोन-पे’ने मिळवून दिला पुरावा
गोदामात मारहाण होत असताना, संशयितांपैकी एकाने त्या भंगार व्यावसायिकाकडून ‘फोन-पे’द्वारे काही पैसे उकळले होते. या डिजिटल व्यवहाराचा पाठपुरावा करत पोलिस संकेत जगतापपर्यंत पोहोचले. त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने हत्येची कबुली दिली. संदीप हा महापे परिसरात विजेच्या डीपी आणि खांबांवरील वायर चोरी करताना संशयितांना रंगेहाथ सापडला होता. त्यामुळे संतापलेल्या या चौकडीने त्याला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी अमोल गुंजाळच्या रिक्षातून संदीपचा मृतदेह नाल्याशेजारी फेकून दिला होता. त्यानुसार गुन्हे शाखेने या प्रकरणात प्रीतम भरत भोईर (वय २६), शिवाजी शंकर डुंबरे (५७), अमोल रमेश गुंजाळ (३१) आणि संकेत राजाराम जगताप ऊर्फ बाब्या (२९) यांना अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाणी समजून टरपेंटाईन पिलं, दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; नागपूरमधील घटना

Gadchiroli News: उघड्यावर असलेले धान उचलणार कधी?; दुर्लक्षामुळे धान्याची नासाडी; दोन लाख ३८ हजार ५४९ क्विंटल धानाची उचल नाहीच

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

Global Economy: युद्धामुळे इंधन, खतांचे दर दीर्घकाळ चढेच राहणार; IMF आणि जागतिक बँकेचा इशारा!

IPL, CSK vs KKR: अजिंक्य रहाणे दुहेरी कात्रीत सापडला; आधी कोलकाताने मॅच हरली, नंतर BCCI ने कारवाई केली; नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT