मुंबई

मुंबई विद्यापीठातील पाली भवन, संशोधन केंद्र उभारणीला वेग द्यावा

CD

‘पाली भवन’, ‘डॉ. आंबेडकर संशोधन केंद्रा’ला गती द्या
राजकुमार बडोले यांची मुंबई विद्यापीठाला सूचना
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : मुंबई विद्यापीठात पाली भाषा इमारत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र उभारणीची प्रक्रिया दीर्घकाळापासून रेंंगाळत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार राजकुमार बडोले यांनी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे यांची भेट घेतली. पाली भवन, संशोधन केंद्र उभारणीला वेग द्यावा, अशा सूचना बडोले यांनी केल्या.

आमदार बडोले यांनी सांगितले की, २०२३-२४ मध्ये केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाकडून सुमारे ४९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्याचे भूमिपूजनही झाले आहे. यामध्ये पालीसह इतर भाषांच्या अभ्यासासाठी सुविधा उभारण्याचा प्रस्ताव आहे. प्र-कुलगुरू डॉ. भामरे यांनी १२ हजार चौ.फूट जागा पाली विभागासाठी देण्यात येणार असून, बांधकाम प्रक्रियेची तयारी सुरू असल्याचे सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रासाठी सुरुवातीला सहा एकर जागेची अपेक्षा होती; मात्र सध्या दोन एकर जागा उपलब्ध झाल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले.निधीअभावी बांधकाम थांबल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यापीठातील माजी पीएचडी संशोधक भंते विमान्सा हे गेल्या ऑगस्ट महिन्यापासून विद्यापीठ परिसरात सत्याग्रह करत आहेत. पीएचडी नोंदणीबाबत विद्यापीठ प्रशासनाने अन्यायकारक भूमिका घेतल्याचा त्यांचा आरोप आहे. भंते विमान्सा आणि विद्यापीठ प्रशासनाचे मत बडोले यांनी समजून घेतले. आंबेडकर संशोधन केंद्र आणि वसतिगृह प्रश्नावरही संबंधित विभागांशी समन्वय साधून तातडीने मार्ग काढावा, असे त्यांनी सुचवले.

विधिमंडळात आवाज उचलणार
या प्रश्नावर लक्षवेधीच्या माध्यमातून विधानसभेत आवाज उठवण्याचा तसेच राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि संबंधित मंत्र्यांची भेट घेऊन तोडगा काढणार असल्याचे आमदार बडोले यांनी सांगितले. सर्व आमदारांची बैठक घेऊन एकत्रितपणे या प्रश्नावर पुढाकार घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई विद्यापीठातील पाली विभाग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राच्या उभारणीचा प्रश्न केवळ शैक्षणिक नसून सामाजिक न्यायाशी निगडित आहे. त्यामुळे विद्यापीठाने सकारात्मक आणि समन्वयात्मक भूमिका घेतल्यास हा प्रश्न मार्गी लागू शकतो.
डॉ. राजकुमार बडोले, माजी सामाजिक न्याय मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

Vaibhav Sooryavanshi ला भारतीय संघात पदार्पणाची संधी द्यायला हवी का? ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणतो, अरे त्या पोराला खेळू द्या...

Pune Crime : खंडणीसाठी कानपूरच्या व्यावसायिकाचे अपहरण; पाच आरोपींना अटक

SCROLL FOR NEXT