एसआयआयएलसी
ॲमेझॉनवर विका स्वतःची उत्पादने
पुणे, ता. २८ : ॲमेझॉनवर उत्पादन विकायचे असेल, तर त्याची प्रक्रिया काय आहे, नोंदणी कशी करावी, कोणते कागदपत्रे लागतात, किती दिवस लागतात, हे सर्व करून बिजनेस कसा वाढवायचा, ॲमेझॉनवर विक्री करण्यास किती खर्च लागतो, सेलर पोर्टल कसे असायला हवे आदींबाबत मार्गदर्शन करणारी ऑनलाइन कार्यशाळा ७ मार्चला होणार आहे. कार्यशाळेत उत्पादन कसे लिस्ट करावे, डिलिव्हरी, रिटर्न्स असतील, तर ते कसे हाताळावे, ॲमेझॉन ॲपवरती उत्पादन जास्तीत जास्त कसे दिसतील, जेणेकरून विक्री वाढेल, ऑफर कशा ठेवायच्या, उत्पादन स्पॉन्सर कसे करायचे, पेमेंट कसे पाहायचे, तत्काळ सपोर्ट कसा घ्यायचा याबाबत मार्गदर्शन होईल.
क्लाउड किचन व्यवसायाद्वारे वाढवा उत्पन्न
कमी गुंतवणुकीत स्वतःचा क्लाउड किचन व्यवसाय कसा सुरू करायचा याबाबत मार्गदर्शन करणारी कार्यशाळा १५ मार्चला होणार आहे. क्लाउड किचनमध्ये व्यावसायिक स्वयंपाकघरातील जागा वापरुन फक्त डिलिव्हरी किंवा टेकअवेसाठी अन्न तयार केले जाते, ज्यामध्ये संपूर्ण रेस्टॉरंट सेटअपची आवश्यकता नसते. यामुळे हा खूप स्वस्त आणि सुरुवात करण्यास सोपा असा व्यवसाय आहे. कार्यशाळेत स्वतःचा क्लाउड किचन ब्रँड कसा सुरू करावा, घरून मेस किंवा कॅन्टीन कसे चालवावे, कॅफे किंवा रेस्टॉरंट्सद्वारे स्वयंपाकघर कसे व्यवस्थापित करावे, स्वच्छता आणि सुरक्षितता कशी राखावी यासह सरकारी नियम, परवाने आणि नियम याबाबत मार्गदर्शन होणार आहे. ज्यांना हॉटेल, टिफिन सेवा किंवा मेस व्यवसाय उघडायचा आहे; परंतु मोठे बजेट नाही, त्यांच्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त आहे.
कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) प्रशिक्षण
एनजीओ व सामाजिक काम करणाऱ्या संस्थांना आर्थिक गरज मोठ्या प्रमाणात असते. सीएसआर फंडिंगमधून त्यांना ही गरज भागवता येते. मात्र हे फंडिंग कसे मिळवावे, यासाठीचे नियम व कायदे काय आहेत, संस्थेचा प्रोजेक्ट रिपोर्ट कसा सादर करावा याची बहुतेकांना माहिती नसते. या पार्श्वभूमीवरील सीएसआर ट्रेनिंग १५ मार्च रोजी आयोजिले आहे. यामध्ये सीएसआर नेमके काय आहे आणि काय नाही, सीएसआर कायदा, अंमलबजावणी संस्थांची भूमिका, रिपोर्टींग फ्रेमवर्क, अंमलबजावणी करण्यापूर्वी, दरम्यान आणि नंतरची प्रक्रिया, सरकारच्या अपेक्षा, भूमिका आणि जबाबदाऱ्या, सीएसआर फंडींगसाठी आवश्यक कागदपत्रे व प्रक्रिया आदी बाबींवर मार्गदर्शन होणार आहे.
एसआयआयएलसीच्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.