मुंबई

प्रभू श्रीरामांवरील अपशब्दांचा व्हिडिओ व्हायरल; शिवसेनेचा निषेध; गुन्हा दाखल, शहरात कडक पोलीस बंदोबस्त!

CD

प्रभू श्रीरामांवरील अपशब्दांचा व्हिडिओ व्हायरल;
शिवसेनेचा निषेध; गुन्हा दाखल, शहरात कडक पोलिस बंदोबस्त!

बदलापूर, ता. २८ (बातमीदार) ः बदलापूर पूर्व भागातील भाजपच्या महिला शहराध्यक्षांच्या मुलीने प्रभू श्रीरामांबाबत अपशब्द वापरल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर नुकताच व्हायरल झाल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली. या व्हिडिओमुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप होत असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. वाढत्या दबावानंतर आणि निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बदलापूर पूर्व भाजप महिला शहराध्यक्षा प्रतिभा जाधव यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. हा प्रकार समोर आल्यानंतर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, परिस्थितीवर पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

शिवसेनेनेही या घटनेनंतर या प्रकरणात उडी घेत तीव्र निषेध व्यक्त केला आहे. संबंधित तरुणीविरोधात बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शहरातील संवेदनशील भागांत मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निषेधार्थ अनेक भागांतील दुकाने बंद ठेवण्यात आली, तर काही ठिकाणी रिक्षाचालकांनीही रिक्षा बंद ठेवत आपला रोष व्यक्त केला. नागरिकांनी शांतता राखावी व कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत असून, प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

Maharashtra GAIL Project: आता वाऱ्यापासून वीज तयार होणार! गेल महाराष्ट्रात मेगा प्रकल्प उभारणार; पवनऊर्जा विस्ताराला बूस्ट मिळणार

Ajit Pawar, DGCA Report आला समोर, आदिती तटकरे थेट बोलल्या...

SCROLL FOR NEXT