मुंबई

वऱ्हाळदेवी तलावात मृतदेह सापडल्याने खळबळ

CD

भिवंडी, ता. २८ (वार्ताहर) : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वऱ्हाळदेवी तलाव येथे शुक्रवारी सकाळी एका अज्ञात तरुणाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. सकाळच्या सुमारास तलाव परिसरात फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली.
भिवंडी शहर पोलिस ठाणे येथील पथक आणि महापालिकेच्या अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. जवानांनी तलावातून मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी स्व. इंदिरा गांधी स्मृती रुग्णालय येथे पाठविला. दरम्यान, या घटनेची नोंद शहर पोलिस ठाण्यात केली असून मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. संबंधित तरुणाचा मृत्यू अपघाती बुडाल्याने झाला की अन्य कोणत्या कारणामुळे, याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिकांकडून माहिती घेऊन पुढील तपास केला जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी नागरिकांना अफवा न पसरविण्याचे आवाहन केले असून तपास पूर्ण झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: विमान अपघाताचा २२ पानांचा प्राथमिक अहवाल आला; ब्लॅक बॉक्समध्ये काय आढळलं? विमान झाडावर कोसळलं अन्...

Israel Iran War: इस्रायल-इराण तणावाचा परिणाम! दुबई, सौदी, कतारला जाणारी एअर इंडियाची उड्डाणे रद्द; वाहतुकीवर युद्धाचे सावट

एक नाही बिग बॉस मराठीच्या घरात होणार तीन वाईल्ड कार्ड ENTRY ? या सेलिब्रिटींची सोशल मिडीयावर चर्चा

T20 WC, IND vs WI: रिंकू सिंगनं वडिलांच्या निधनाचं दुःख बाजूला सारून टीम इंडियासाठी कोलकाता गाठलं; Video Viral

Latest Marathi News Live Update : अक्षता टाकण्यापूर्वीच वरपित्याचा मृत्यू..! माजी सैनिकांची मानवंदना

SCROLL FOR NEXT