मुंबई

आठवडा बाजारात गर्दीचा उच्चांक

CD

आठवडा बाजारात गर्दीचा उच्चांक
कासा परिसरात होळीनिमित्त खरेदीचा उत्साह
कासा, ता. १ (बातमीदार)ः ग्रामीण भागात होळी-शिमगा मोठा सण मानला जातो. आदिवासीबांधव परंपरेनुसार आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी आठवडा बाजारांमध्ये गर्दी करत असल्याने कासा परिसरातही सणाचा उत्साह संचारला आहे.
आजच्या बाजारात होळीच्या पूजेसाठी लागणाऱ्या साखरमाळा, नारळ, हार-फुले, पुरणपोळीकरिता गूळ, मैदा तसेच रंग व पिचकारींची दुकाने मोठ्या संख्येने लागली होती. या वेळी रोजंदारीवर काम करणारे नागरिक संसारोपयोगी माल, कपडे, ताजी हिरवी भाजीपाला, सुके मासे, खेळणी, शेतीसाठी लागणारे साहित्य, कणगे, सूप खरेदी करताना दिसले. सूर्यानगर, तलवाडा, वांगर्जे, पिंपळशेत, वाघाडी, बापूगाव, तवा, चारोटी, भराड, घोळ, सोनाळे, महालक्ष्मी, सारणी गावांतून मोठ्या प्रमाणावर नागरिक आल्याने बाजारात चैतन्य दिसून आले. पारंपरिक पद्धतीने सण साजरा करण्याकडे लोकांचा कल वाढला असून, खाण्या-पिण्याच्या वस्तूंची विक्री तुलनेने जास्त झाली आहे.
--------------------------
पोलिसांकडून बंदोबस्त
होळी-शिमग्याच्या निमित्ताने चार दिवसांची सुट्टी मिळाल्याने चाकरमानी गावी परतले आहेत. मोलमजुरी, वीटभट्टी, बागकामासाठी बाहेर गेलेले अनेक कुटुंबे पुन्हा गावात आली आहेत. काहींनी मजुरीतून जमवलेल्या रकमेतून सणासाठी खरेदी सुरू केली आहे. डहाणू-जव्हार मार्गावर कासा बाजारपेठ रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती, तर वाढलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
---------------------------------
गणपती, दिवाळी, होळी महत्त्वाचे सण आहेत. त्यात होळीला मोठे स्थान आहे. तीन-चार महिने बाहेर काम करून मिळालेले पैसे हातात आल्यावर सणानिमित्त मोठी खरेदी होते. त्यामुळे चार दिवसांत चांगला व्यवसाय होतो.
- प्रणव घारपुरे, दुकानदार

Arvind Kejriwal : ...तर राजकारण सोडून देईन, अरविंद केजरीवाल यांचे दिल्लीतील जंतरमंतरवरून आव्हान

AI in Army : आता 'फौजी' बनणार AI! सॅम ऑल्टमननी सैन्याशी केली हातमिळवणी, नेमकं तंत्रज्ञान काय? पाहा

Latest Marathi News Update : कांद्याला कवडीमोल भाव; विंचूरमध्ये स्वाभिमानीचा ‘रस्ता रोको’

Satara Robbery: कामावरून काढलं अन् टाकला दराेडा! अंगडिया कर्मचाऱ्याकडून लुटले ३२ लाखांचे दागिने, साताऱ्यातील दराेड्याप्रकरणी नेमकं काय घडलं..

IPL 2026 वर नवं संकट, स्पर्धा आधीच दोन दिवस पुढे ढकलावी लागतेय, त्यात आता रद्द होतेय की काय ही भीती... नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT