मुंबई

खालापुरात भाजपा शब्द पाळणार?

CD

खालापुरात भाजप शब्द पाळणार?
पंचायत समिती सभापतिपद शिंदे गटाला मिळणार
खालापूर, ता. १ (बातमीदार) ः खालापूर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतिपदाची निवडणूक ११ मार्च रोजी होणार आहे. या निवडणुकीत महायुतीचे स्पष्ट बहुमत असले, तरी सत्तासमीकरणांतून आता भाजप-शिंदे गट युतीमध्ये शब्द पाळला जाणार की रायगड जिल्हा परिषदेच्या घडामोडींचा दुसरा अंक येथे पाहायला मिळणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात वाढली आहे.
पंचायत समितीच्या निवडणूक भाजप आणि शिंदे गट युतीने एकत्र लढत विजय मिळवला आहे. जिल्हा परिषदेच्या दोन जागा युतीने खालापुरात जिंकल्या असून, पंचायत समितीच्या इतिहासात प्रथमच भाजपला सर्वाधिक आठपैकी तीन जागा मिळाल्या, तर शिंदे गटाला दोन जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे बहुमत युतीकडे आहे, तर ठाकरे सेनेला दोन आणि अजित पवार गटाला एक जागा मिळाली आहे. पंचायत समिती सभापतिपद सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे. पंचायत समितीत भाजप मोठा भाऊ असला तरी सुरुवातीला सभापतिपद शिंदे गटाला देण्यात येईल, असे ठरले होते.
रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भाई शिंदे यांनी शिंदे गटाकडून खानाव गणातून पंचायत समिती निवडणूक जिंकली आहे. सभापतिपदासाठी त्यांची दावेदारी प्रमुख मानली जात आहे. भाजपने तीन जागा जिंकल्या असून, रिस गणातून विजय मिळवलेले कृष्णा पारंगे देखील सभापतिपदासाठी दावेदारी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संभाव्य फॉर्म्युला
भाई शिंदे यांचा राजकीय आणि प्रशासनाचा अनुभव पाहता पंचायत समिती सभापतिपदासाठी ते प्रमुख दावेदार आहेत. भाई शिंदे यांना अडीच वर्ष सभापतिपद देऊन उपसभापतिपद भाजपच्या वाट्याला जाऊ शकते. उपसभापतिपदासाठी वाशिवली गणातून विजय मिळवलेल्या गौरी गडगे यांचे नावदेखील आघाडीवर आहे. अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला तरी सुरुवातीला सभापतिपद कोणाच्या वाटेला जाणार याकडे कार्यकर्त्यांच्या नजरा लागल्या आहेत.


**फोटो-१) गौरी गडगे. २) भाई शिंदे ३) कृष्णा पारंगे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT