मुंबई

कर्मचारी संघाचा एकात्मता दिवस साजरा

CD

सेवानिवृत्त कर्मचारी संघाचा २२वा एकात्मता दिन उत्साहात

कासा, ता. १ (बातमीदार) : कासा विभाग सेवानिवृत्त कर्मचारी संघाचा वार्षिक सोहळा असलेला २२वा एकात्मता दिन कासा येथील शिव मंदिर हॉल येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शनिवारी (ता. २८) पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र गावित तसेच कासा पोलिस ठाण्याचे अधिकारी अमर पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमास डहाणू सेवानिवृत्त कर्मचारी संघाचे अध्यक्ष मारुती वाघमारे, पालघर जिल्हा सेवानिवृत्त संघाचे उपाध्यक्ष भालचंद्र चुरी, महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट, कासाचे अध्यक्ष संतोष देशमुख, कासा उपसरपंच हरीश मुकणे यांच्यासह विविध विभागांचे पदाधिकारी व सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मार्गदर्शन करताना अमर पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेविषयी माहिती देत पोलिस प्रशासन सदैव सहकार्य करेल, असे सांगितले. आमदार राजेंद्र गावित यांनी सेवानिवृत्ती म्हणजे आयुष्याचा शेवट नसून, नव्या आनंदाचा आरंभ आहे. आयुष्यभर कष्ट केलेल्या ज्येष्ठांनी पुढील काळ समाधान व आनंदात घालवावा, असे आवाहन केले आणि निवृत्ती संघटनांच्या प्रश्नांवर मदतीचे आश्वासन दिले.
संघाचे अध्यक्ष हेमंत धानमेर यांनी संघाच्या कार्याचा आढावा सादर केला, तर ईश्वर काकडे यांनी वार्षिक अहवाल मांडला. दापचरी दुग्ध प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन प्रश्नांवर संघाने केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख करण्यात आला. कार्यक्रमात ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ सदस्यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्यासाठी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपाध्यक्ष श्रावण गावीत, उपाध्यक्ष काशिनाथ डोईफोडे, एस. सुतार तसेच सल्लागार महेंद्र पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT