मुंबई

डीबीएटीयूच्या डीएफआयआयई केंद्राला दूरसंचार विभागाची भेट

CD

डीबीएटीयूच्या डीएफआयआयई केंद्राला दूरसंचार विभागाची भेट
स्टार्टअप, नवोपक्रम व उद्योजकता विकास उपक्रमांचा घेतला सविस्तर आढावा
माणगाव, ता. ३ (वार्ताहर) : लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठअंतर्गत कार्यरत डीएफआयआयई केंद्राला दूरसंचार विभागाच्या सहाय्यक संचालक (तंत्रज्ञान) सुमित्रा सरडा यांनी भेट देत विविध उपक्रमांची पाहणी केली. केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या स्टार्टअप प्रोत्साहन योजना, नवोपक्रम, उद्योग-संलग्न प्रकल्प व उद्योजकता विकास कार्यक्रमांचा सविस्तर आढावा या वेळी घेण्यात आला.
बैठकीत इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रतिनिधी प्रा. बोंडे व रजनिकांत यांनी संशोधन कार्य, विद्यार्थ्यांच्या स्टार्टअप संकल्पना आणि उद्योग क्षेत्राशी असलेल्या समन्वयाबाबत माहिती सादर केली. डीएफआयआयई केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश काकडे यांनी इनक्युबेशन सुविधा, आर्थिक सहाय्य, तांत्रिक मार्गदर्शन व शासकीय योजनांची अंमलबजावणी याबाबत सविस्तर प्रस्तुतीकरण केले.
सुमित्रा सरडा यांनी केंद्राच्या कार्याचे कौतुक करून दूरसंचार व तंत्रज्ञान क्षेत्रातील संधींचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.


स्टार्टअप संस्कृतीला चालना
या भेटीमुळे उद्योग-संस्था व विद्यापीठ यांच्यातील समन्वय वाढून नावीन्यपूर्ण प्रकल्पांना प्रोत्साहन मिळणार असून डीएफआयआयई केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्टार्टअप व संशोधनाची संस्कृती अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War: इराण-इस्रायलच्या लढाईत भारताला फटका! चार दिवसांत मोठं आर्थिक नुकसान, धक्कादायक आकडेवारी समोर

IND vs ENG: चंद्रग्रहणात सराव... नको रे बाबा! भारतीय संघाने वानखेडेवरील सरावाची वेळ बदलली, सूर्याच्या संघाने 'ती' वेळ टाळली

Drunk and Drive Crime : ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ विरोधात मोहीम! तीन दिवसांत ३०१ मद्यपी चालकांवर कारवाई

Latest Marathi News Live Update: एका महिन्यात चार बिबटे जेरबंद

Baba Venga Prediction : इराण–इस्रायल–अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर बाबा वेंगा यांची भविष्यवाणी चर्चेत

SCROLL FOR NEXT