मुंबई

कोकण भवनसमोरील अनधिकृत बांधकामांवर सिडकोची कारवाई

CD

कोकण भवनसमोरील अनधिकृत बांधकामांवर सिडकोची कारवाई
बेलापूर नोडमध्ये भाजी मंडई, फळ मार्केटसह तात्पुरती शेड्स हटवली; साहित्य जप्त
बेलापूर, ता. २८ (बातमीदार) : सिडकोच्या अनधिकृत बांधकामे विभागामार्फत २७ फेब्रुवारी रोजी बेलापूर नोड येथे मोठी निष्कासन मोहीम राबवून सेक्टर १०, भूखंड क्र. ११, कोकण भवनसमोरील सुमारे ६०० चौ.मी. क्षेत्रातील भाजी मंडई, फळ मार्केट तसेच दोन तात्पुरती बांबू-ताडपत्री शेड्स हटविण्यात आली. यासोबतच बेलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाले, फळविक्रेते व ज्यूस सेंटरवरही कारवाई करण्यात येऊन सर्व साहित्य जप्त करण्यात आले.
सदर बांधकामे सिडकोच्या अधिसूचित जागेवर कोणतीही अधिकृत परवानगी न घेता उभारण्यात आल्याने नियमावलीनुसार कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. मोहिमेसाठी एक जेसीबी, दोन जीप, दोन ट्रक व २० कामगारांचा वापर करण्यात आला. मुख्य दक्षता अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण विभागाचे अधिकारी, सिडको पोलीस पथक व सुरक्षा यंत्रणेच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली.
चौकट
अनधिकृत बांधकामांवर नियंत्रणाची गरज
शहरात वाढत्या अतिक्रमणांमुळे वाहतूक, स्वच्छता व नागरिकांच्या सुरक्षेचे प्रश्न निर्माण होत असून नियोजनबद्ध विकासासाठी अशा कारवाया सातत्याने होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मुंबईतील भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! सिद्धिविनायक मंदिरासह 'ही' प्रसिद्ध मंदिरे बंद राहणार; कधी आणि का? जाणून घ्या वेळ

शेतमाल विक्री करणाऱ्यांनो सावधान! व्यापाऱ्यांच्या अनुज्ञप्ती रद्द करण्याची प्रक्रिया सुरू; नेमके कारण काय?

T20 WC, IND vs WI : भारतीय संघाने टॉस जिंकला, सूर्याने अचंबित करणारा निर्णय घेतला; प्रेक्षकांमध्ये थोड्यावेळासाठी सन्नाटा...

Latest Marathi News Update : तामिळनाडू कॉंग्रेसमुक्त पहिले राज्य, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गौरवोद्गार

Iran Israel War: मध्य पूर्वेतील संघर्षाचा फटका बसणार! भारतात गॅस सिलेंडरचे दर वाढणार? एलपीजी ग्राहकांची चिंता वाढली

SCROLL FOR NEXT