शालेय विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप
विक्रमगड, ता. १ (बातमीदार) : ग्रामीण व दुर्गम भागातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, या उद्देशाने पालघर पोलिस दल, विक्रमगड पोलिस ठाणे आणि रिसोनिया लिमिटेड कुंर्झे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने खुडेद-महालेपाडा येथे जनसंवाद कार्यक्रम व विद्यार्थ्यांना सायकलवाटप उपक्रम पार पडला. कार्यक्रमाला कोकण परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक संजय दराडे प्रमुख उपस्थित होते.
या वेळी दराडे यांनी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही उच्च शिक्षण घेऊन आपले ध्येय साध्य करावे, तसेच शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असा संदेश त्यांनी दिला. तसेच बारावीनंतर अनेक पदावर सरकारी नोकऱ्या उपलब्ध आहेत. त्या योजनांचा लाभ घ्यावा व सध्या शिक्षणाशिवाय कुठलीच संधी मिळत नाही, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक विनायक मरळे, उपविभागीय पोलिस अधिकारी समीर मेहेर, पोलिस निरीक्षक अजित गोळे, रिसोनिया लिमिटेडचे अधिकारी, खुडेद ग्रामपंचायतीचे सरपंच, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या दळणवळणाच्या अडचणी दूर करण्यासाठी करण्यात आलेल्या सायकलवाटप उपक्रमाचे सर्वत्र स्वागत करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.