गरजू शिवसैनिकाला मदतीचा हात
उपचारासाठी ५० हजारांची मदत; रामबाग शाखेचा पुढाकार
डोंबिवली, ता. ३ : कल्याण पश्चिमेतील रामबाग परिसरातील निष्ठावंत शिवसैनिक आणि ओम कबड्डी संघाचे खेळाडू मंगेश नेटावटे सध्या किडनीच्या गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. त्यांच्या या कठीण काळात शिवसेना ठाकरे गटाच्या रामबाग शाखेने सामाजिक बांधिलकी जपत ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे.
मंगेश नेटावटे यांना किडनीच्या आजारामुळे नियमित डायलिसिस करावे लागत आहे. या उपचारांचा दरमहा खर्च मोठा असल्याने त्यांच्या कुटुंबावर आर्थिक ताण निर्माण झाला होता. नुकतेच त्यांच्यावर मीरा हॉस्पिटलमध्ये १५ दिवस उपचार करण्यात आले. रुग्णालय प्रशासनानेही माणुसकी दाखवत त्यांच्या बिलामध्ये सवलत देऊन सहकार्य केले.
नेटावटे यांच्या वाढत्या वैद्यकीय खर्चाचा विचार करून रामबाग शाखेतर्फे आयोजित शिवजयंती कार्यक्रमात ५० हजार रुपयांचा धनादेश त्यांना सुपूर्द करण्यात आला. आपल्या सहकाऱ्याच्या संकटात धावून जाणे हीच खरी शिवसेना आहे. सामाजिक बांधिलकी जपत एका गरजू शिवसैनिकाला हा मदतीचा हात देण्यात आला आहे, अशी भावना शिवसेनेचे उपनेते विजय साळवी यांनी व्यक्त केली. याप्रसंगी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भविष्यातही अशाच प्रकारे गरजूंना मदत करण्याचे कार्य सुरू राहील, असा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.