मुंबई

बिस्मिल्ला मशीद परिसरात दुर्गंधी

CD

कल्याणच्या गोविंदवाडीत दुर्गंधी
महापौरांच्या आदेशाला केराची टोपली; नगरसेविका समीना शेख यांचा आंदोलनाचा इशारा

डोंबिवली, ता. ३ : रमजानचा पवित्र महिना सुरू असतानाच कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडी परिसरातील बिस्मिल्ला मशीद परिसरात सांडपाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ठिकठिकाणी साचलेले घाण पाणी आणि पसरलेल्या दुर्गंधीमुळे स्थानिक रहिवासी आणि नमाजसाठी येणाऱ्या भाविकांचे आरोग्य धोक्यात आले असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.

गोविंदवाडी परिसरात असलेल्या मोठ्या तबेल्यांतून निघणारे सांडपाणी थेट रस्त्यावर येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने डबकी साचली असून, त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. याचा सर्वाधिक त्रास लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागत आहे.

रमजाननिमित्त दिवसातून पाच वेळा नमाज पठणासाठी मशिदीत मोठी गर्दी असते. मात्र मशिदीच्या प्रवेशद्वारापाशीच सांडपाणी साचल्याने भाविकांना या घाण पाण्यातूनच ये-जा करावी लागते. पवित्र महिन्यात अशा परिस्थितीतून मार्ग काढावा लागत असल्याने स्थानिक मुस्लीम बांधवांमध्ये प्रशासनाविरुद्ध प्रचंड नाराजी आहे.

आदेश कागदावरच?
विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात कल्याण-डोंबिवलीच्या महापौर हर्षाली चौधरी यांनी स्वतः या भागाची पाहणी करून पाणी उपसण्याचे आणि स्वच्छतेचे कडक निर्देश दिले होते. मात्र अधिकाऱ्यांनी या आदेशाची अद्याप अंमलबजावणी केलेली नाही. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन झोपले आहे का? महापौरांच्या आदेशानंतरही जर परिस्थिती बदलत नसेल तर हेच साचलेले घाण पाणी महापालिका अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये नेऊन टाकू, असा इशारा नगरसेविका समीना सलीम शेख यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: शेतकऱ्यांनी रोखला शिक्रापूर-पाबळ मार्ग; चासकमान कालव्याच्या अस्तरीकरणाला कडाडून विरोध, शेती आणि पाणी संकटात येईल

Latest Marathi News Live Update : पुण्यातील अनधिकृत हाऊस पार्टी प्रकरणातील सर्व तरुणांच्या पालकांना पोलीस पाठवणार नोटीस

रंगभूमी गाजवलेला गारंबीचा बापू आता रुपेरी पडद्यावर ! पोस्टरने वेधलं लक्ष

Viral Video:"‘मी का थांबावं?’ निवृत्तीच्या प्रश्नावर हरमनप्रीतचा पलटवार; चाहत्यांना आठवला धोनीचा Viral Moment"

Panhala Fort Tourism Tax : पन्हाळा गडावर पर्यटकांची मोठी कोंडी! 15 रुपये कर देऊनही 'या' एका सुविधेसाठी करावी लागतेय कसरत; पाहा काय आहे स्थिती

SCROLL FOR NEXT