सरळगाव, ता. ३ (बातमीदार) : मुरबाड तालुक्यातील शिवळे गावाने ‘एक गाव, एक होळी’ ही परंपरा तब्बल ५० वर्षांपासून जपली आहे. सुमारे तीन हजार लोकसंख्या असलेल्या या गावात विविध जाती-धर्म व भिन्न राजकीय विचारांचे ग्रामस्थ राहतात. तरी सण-उत्सवाच्या वेळी सर्वजण एकाच झेंड्याखाली एकोप्याने उभे राहतात, हे या परंपरेचे वैशिष्ट्य आहे.
शिवळे येथे सर्व आळ्यांची मिळून एकच सामूहिक होळी केली जाते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास ईसामे कुटुंबीयांचे कुलदैवत वाजतगाजत होळीच्या ठिकाणी आणले जाते. नवविवाहित वधू-वरांच्या हस्ते विधीपूर्वक पूजन करून होळी प्रज्वलित केली जाते. त्याचवेळी ग्रामस्थांकडून ‘फोद्यारे हो’ असा पारंपरिक जयघोष केला जातो. या घोषणेचा अर्थ आजतागायत उलगडलेला नसला, तरी परंपरा मात्र अबाधित आहे. होळीला नैवेद्य म्हणून आणलेली पुरणपोळी होळीत न टाकता ती एकत्र गोळा करून ज्या घरात पुरणपोळी बनत नाही अशा गरजू कुटुंबांना वाटप करण्याची परंपराही गावातील तरुणांनी जपली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.