मुंबई

स्मार्ट वीज मीटर बसवण्यास स्थानिकांचा विरोध

CD

स्मार्ट वीज मीटर बसवण्यास स्थानिकांचा विरोध
स्थानिक, संघटनेचा विरोध होताच बेस्टने कामकाज केले बंद

धारावी, ता. ३ (बातमीदार) : बेस्ट प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता सार्वजनिक केबिनमधील जुने वीज मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसवण्यास सुरुवात केल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविल्याची घटना घडली आहे. धारावी मुख्य रस्त्यावरील चर्मकार समाजाची जुनी वस्ती असलेल्या सकिनाबाई चाळ येथील श्री गणेश सोसायटीमध्ये शुक्रवारी (ता. २७) हा प्रकार घडला. त्यामुळे काही काळ येथे तणावाचे वातावरण होते.
सुरुवातीला स्थानिकांना दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे वाटले; मात्र काही वेळाने कोणतीही सूचना न देता मीटर बदलण्याचे काम सुरू असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर हराळे संघाचे अध्यक्ष शंकर बळी, गणेश शिर्के, सुरेखा सावंत, अनुसया माने, विशाल कारंडे, आशा चव्हाण व सुनीता माने आदींनी कामाला विरोध करीत अधिकाऱ्यांना जाब विचारला. अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने नागरिक अधिक आक्रमक झाले.
ही माहिती वाऱ्यासारखी पसरताच मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक जमा झाले. राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनीही अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला. वाढता विरोध पाहता ‘बेस्ट’ प्रशासनाने स्मार्ट मीटर बसवण्याचे काम तात्पुरते थांबवले आहे. हराळे सेवा संघ (हनुमान मंदिर) कार्यालयात मीटर बॉक्स जमा करण्यात आले असून, बेस्टच्या या कृतीचा संघटनेने जाहीर निषेध केला आहे.
स्थानिकांना विश्वासात न घेता किंवा परवानगीशिवाय केबिनला हात लावू नये तसेच स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया तत्काळ थांबवावी, अशी मागणी हराळे सेवा संघ आणि राष्ट्रीय चर्मकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी बेस्ट अधिकाऱ्यांकडे केली आहे.

धारावी : कोणतीही पूर्वकल्पना न देता स्मार्ट वीज मीटर बसवण्यात येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: पश्चिम बंगाल निवडणूक! मध्यरात्री सुप्रीम कोर्टात हालचाली; 'या' IPS अधिकाऱ्याला तातडीने हटवण्याची मागणी

Karad Accident: टाकीत बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू; कऱ्हाड तालुक्यातील दुर्दैवी घटना, चेंडू काढण्यासाठी गेला अन् काय घडलं?

मोठा निर्णय! शाळा ते शिक्षणमंत्र्यांपर्यंत फाईलचा प्रवास आता ऑनलाइन; शाळा, तुकडी मान्यता, अनुदानाचा वाढीव टप्पा मंजुरीतील वशिलेबाजी, बनावटगिरी थांबणार

सोलापूरकरांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचे रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत जागरण! पोलिसांच्या मदतीसाठी ‘या’ क्रमांकावर साधा संपर्क, वाचा...

मोठी बातमी! शिक्षण आयुक्तांच्या आदेशाने शिक्षकांची वाढली डोकेदुखी; १ मे रोजी निकालावेळी पालकांना दाखवाव्या लागणार त्यांच्या मुलांच्या उत्तरपत्रिका

SCROLL FOR NEXT