मुंबई

धुळवड न खेळता परंपरा जोपासली : एकनाथ शिंदे

CD

म्हणून धुळवड न खेळता केवळ परंपरा जोपासली : एकनाथ शिंदे
अजितदादा पवार यांच्या निधनामुळे यंदाचा उत्सव रद्द

ठाणे, ता. ३ : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात झालेले आकस्मिक निधन आणि शिवसेनेच्या निकटवर्तीयांच्या कुटुंबातील शोकांतिका, यामुळे यंदाची धुळवड जल्लोषात साजरी न करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. ‘‘हे दु:ख आमच्या परिवारातील असल्याने यंदा केवळ परंपरा जोपासण्याचे काम आम्ही करत आहोत,’’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाण्यात केले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभी नाका येथील आनंद आश्रमात जाऊन वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेवर गुलालाची उधळण केली. या वेळी त्यांनी नागरिकांना रासायनिक रंगांचा वापर टाळून पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचे आवाहन केले, ज्यास ठाणेकरांनी मोठा प्रतिसाद दिला.

इराण-इस्राईल-अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे मध्य पूर्वेतील हवाई क्षेत्र बंद झाले आहे. यामुळे दुबई आणि यूएईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने हालचाली केल्या. ‘स्टार एअर’च्या दोन विशेष विमानांद्वारे १६४ प्रवाशांना सुखरूप मुंबईत आणण्यात आले आहे. यामध्ये पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीजचे ८४ विद्यार्थी आणि ठाणे, मुरबाड, अहिल्यानगरमधील नागरिकांचा समावेश आहे.

विशाखा सुभेदार यांच्या मुलाला सुखरूप परत आणणार
मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय सुभेदार हा लंडनला जात असताना कुवेत विमानतळावर अडकला आहे. विशाखा यांनी व्हिडिओद्वारे केलेल्या मदतीच्या याचनेची उपमुख्यमंत्र्यांनी तत्काळ दखल घेतली. उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी राहुल गेठे यांनी अभिनयशी संपर्क साधून त्याची विचारपूस केली. उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः विशाखा सुभेदार यांच्याशी फोनवर संवाद साधून त्यांना धीर दिला. अभिनयची कुवेतमधील हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली असून, विमानसेवा सुरू होताच त्याला सुखरूप मुंबईत आणले जाईल, असे आश्वासन शिंदे यांनी दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Iran War : युद्ध आणखीनच पेटले ! इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्रीही ठार, तेहरानमध्ये विध्वंस

Holi and Bhang Connection: होळीला प्यायली जाणारी भांग कायदेशीर असते का? वाचा कशी पडली परंपरा आणि पौराणिक कथा

IPL 2026 Schedule : गतविजेता RCB पहिल्याच सामन्यात MI किंवा CSK ला भिडणार? BCCI ने वेळापत्रकाबाबत दिले महत्त्वाचे अपडेट्स

Nashik Municipal Corporation : मनपाचा धडक 'सर्जिकल स्ट्राईक'; उंटवाडीतील गॅस रिफिलिंग अड्ड्यावर छापा, ५० सिलेंडर्स जप्त

Nashik Road Development : नाशिकच्या रस्त्यांचे भाग्य उजळणार: मनपा देणार 'बांधकाम टीडीआर', ३१ प्रभागांसाठी १४४ कोटींचा निधी!

SCROLL FOR NEXT