मुंबई

कळंबूसरेतील चक्रीवादळग्रस्तांना मदत नाही

CD

कळंबुसरेतील चक्रीवादळग्रस्तांना मदत नाही
ग्रामस्थ संतप्त
उरण, ता. ३ (वार्ताहर) : २६ मे रोजी आलेल्या भीषण चक्रीवादळात उरण तालुक्यातील कळंबुसरे गावातील सुमारे ५० टक्के घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. अनेक घरांची पत्रे उडाली, भिंती कोसळल्या, तर काही कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त झाला. या घटनेला १० महिने उलटूनही नुकसानग्रस्तांना शासनाकडून एकही रुपया भरपाई मिळालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
चक्रीवादळानंतर तहसीलदारांच्या आदेशानुसार महसूल विभागाने पंचनामे केले. अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त घरांची पाहणी करून अहवाल शासनाकडे सादर केला. मात्र, प्रत्यक्ष मदत न मिळाल्याने अनेक कुटुंबांनी कर्ज काढून किंवा नातेवाइकांच्या मदतीने घरांची तात्पुरती दुरुस्ती केली आहे. काही कुटुंबे अजूनही अर्धवट छपराखाली राहत असून, पावसाळा तोंडावर आल्याने त्यांची चिंता वाढली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींकडून ठोस पाठपुरावा होत नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

चौकट
भरपाईविना पुनर्बांधणीचा वाढता आर्थिक बोजा
नुकसानभरपाई न मिळाल्याने ग्रामस्थांवर आर्थिक ओझे वाढत आहे. अनेकांनी सावकारांकडून किंवा बँकांकडून कर्ज घेत घरांची डागडुजी केली आहे. त्यामुळे व्याजाचा भारही वाढत चालला आहे. शासनाकडून तातडीने थेट लाभार्थ्यांच्या खात्यात मदत जमा न झाल्यास आगामी पावसाळ्यात पुन्हा संकट ओढवू शकते. प्रशासनाने तत्काळ निधी मंजूर करून दिलासा द्यावा, अशी एकमुखी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

कोट
आम्ही पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर केला आहे. शासनाकडून अद्याप कोणतीही भरपाई आलेली नाही. मी स्वतः मंत्रालयात पाठपुरावा करून नुकसानग्रस्तांना भरपाई मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
- उद्धव कदम, तहसीलदार, उरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Iran War : युद्ध आणखीनच पेटले ! इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्रीही ठार, तेहरानमध्ये विध्वंस

Holi and Bhang Connection: होळीला प्यायली जाणारी भांग कायदेशीर असते का? वाचा कशी पडली परंपरा आणि पौराणिक कथा

IPL 2026 Schedule : गतविजेता RCB पहिल्याच सामन्यात MI किंवा CSK ला भिडणार? BCCI ने वेळापत्रकाबाबत दिले महत्त्वाचे अपडेट्स

Nashik Municipal Corporation : मनपाचा धडक 'सर्जिकल स्ट्राईक'; उंटवाडीतील गॅस रिफिलिंग अड्ड्यावर छापा, ५० सिलेंडर्स जप्त

Nashik Road Development : नाशिकच्या रस्त्यांचे भाग्य उजळणार: मनपा देणार 'बांधकाम टीडीआर', ३१ प्रभागांसाठी १४४ कोटींचा निधी!

SCROLL FOR NEXT