मुंबई

ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने होळी उत्साहात साजरी

CD

ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने होळी उत्साहात साजरी

मनोर, ता. ३ : पालघर पूर्वेकडील ग्रामीण भागात पर्यावरणपूरक होळी आणि धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सोमवारी (ता. २) रात्री गावोगावी होळ्या पेटवण्यात आल्या, तर मंगळवारी (ता. ३) रंगांची उधळण करीत मोठ्या उत्साहाने धुळवड साजरी करण्यात आली. पालघर पूर्वेकडील गावांमध्ये सोमवारी रात्री पारंपरिक पद्धतीने, तर काही ठिकाणी पर्यावरणपूरक होळी पाहण्यास मिळाली. तसेच मंगळवारी सकाळपासून धुळवडीचा उत्साह होता. धुळवड साजरी करताना पर्यावरणस्नेही रंग उधळण्यात आले. धुळवड खेळणाऱ्या तरुणांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता.
ग्रामीण भागात सोमवारी रात्री गाव-पाड्यातील ग्रामस्थ होळी दहन करण्यासाठी एकत्र जमले होते. होळीची विधिवत पूजा केल्यानंतर वाजतगाजत गाजत सुक्या लाकडांच्या होळ्या जाळण्यात आल्या. ग्रामीण भागात लग्न होऊन सासरी गेलेल्या मुली पहिल्या होळी सणाच्या निमित्ताने पतीसह माहेरी येतात. होळीला नारळ अर्पण केल्या नंतर पेटत्या होळीला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा ग्रामीण भागात आजही पाहायला मिळते, तर मंगळवारी सकाळपासून धुळवडीचा उत्साह होता. धुळवड साजरी करण्यात तरुणांसह लहानग्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. ठिकठिकाणी रंगांची उधळण केली जात होती. एकमेकांना रंग लावण्यासाठी तरुणांमध्ये स्पर्धा लागली होती. अशा प्रकारे पालघर पूर्व भागातील ग्रामीण भागात होळी आणि धुळवड शांततेत साजरा करण्यात आला.

Iran War: इराण-इस्रायलच्या लढाईत भारताला फटका! चार दिवसांत मोठं आर्थिक नुकसान, धक्कादायक आकडेवारी समोर

IND vs ENG: चंद्रग्रहणात सराव... नको रे बाबा! भारतीय संघाने वानखेडेवरील सरावाची वेळ बदलली, सूर्याच्या संघाने 'ती' वेळ टाळली

Drunk and Drive Crime : ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ विरोधात मोहीम! तीन दिवसांत ३०१ मद्यपी चालकांवर कारवाई

Latest Marathi News Live Update : शेळी चोरल्याच्या संशयातून १४ वर्षीय मुलाची हत्या

Baba Venga Prediction : इराण–इस्रायल–अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर बाबा वेंगा यांची भविष्यवाणी चर्चेत

SCROLL FOR NEXT