विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू
कल्याण-डोंबिवलीत दोन वेगळ्या घटना
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३ : कल्याण-डोंबिवली शहर व ग्रामीण भागात दोन वेगळ्या घटनांत विजेचा धक्का बसून दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अजयकुमार दसई गौतम (२०) आणि संदीप घोरीलाल रावत (३५) अशी मृतांची नावे आहेत.
पहिल्या घटनेत अजयकुमार गौतम हा मूळ उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील बाबुपुरा गावचा रहिवासी होता. तो कामाच्या शोधात मुंबईत आला होता. डोंबिवलीजवळ रविवारी रात्री दुकान बंद करताना हात धुतल्यानंतर ओल्या हातांनी लोखंडी बाकाला स्पर्श झाला. त्या बाकात वीजप्रवाह आल्याने तो काही क्षणांत बेशुद्ध पडला. सहकाऱ्यांनी त्याला तत्काळ एम्स रुग्णालय येथे नेले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दुसऱ्या घटनेत कल्याण पश्चिमेकडील आधारवाडी परिसरात संदीप रावत याचा पाण्याच्या पंपातून आलेल्या विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. तो उत्तर प्रदेशातील होरीलाल गावचा रहिवासी असून, आधारवाडी तुरुंगासमोरील भानुदास गायकर चाळीत राहत होता. घराशेजारी सुरू असलेल्या पंपाजवळ हात-पाय धुताना त्याला विजेचा धक्का बसला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.