मुंबई

मोफत आरोग्य तपासणी शिबिर

CD

मोफत आरोग्य तपासणी शिबिर
शिवडी, ता. ३ (बातमीदार) ः वाहतूक चालकांमध्ये वाढत्या रक्तदाब आणि हृदयविकाराच्‍या झटक्‍यामुळे होणाऱ्या अपघातांचा धोका लक्षात घेता, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली, संघटनेच्या वाहतूक विभागाचे प्रमुख सुनील बोरकर यांच्या पुढाकाराने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसजवळ, काळी-पिवळी टॅक्सी चालकांसाठी, गुरुवारी (ता. ५) सकाळी ९ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत चालणार आहे. येथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदाब, हार्ट अटॅक, आणि इतर आरोग्य तपासण्या मोफत होणार आहेत. युनिट अध्यक्ष अकबर शेख, युनिट सेक्रेटरी दीनानाथ जयस्वाल, युनिट उपाध्यक्ष मोहम्मद अली, तसेच कार्यकर्ते हर्षद गुरव, परशुराम कांबळे, तसलीन खान, नरेंद्र गायकवाड आदी संघटक शिबिर यशस्वी करण्यासाठी कार्यरत आहेत. हा शिबिर परेलमधील आंबेकर श्रम संशोधन संस्थेच्या सहकार्याने पार पडत असून, विभागातील वाहतूक चालकांकडून त्याचे स्वागत होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War: इराण-इस्रायलच्या लढाईत भारताला फटका! चार दिवसांत मोठं आर्थिक नुकसान, धक्कादायक आकडेवारी समोर

IND vs ENG: चंद्रग्रहणात सराव... नको रे बाबा! भारतीय संघाने वानखेडेवरील सरावाची वेळ बदलली, सूर्याच्या संघाने 'ती' वेळ टाळली

Drunk and Drive Crime : ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ विरोधात मोहीम! तीन दिवसांत ३०१ मद्यपी चालकांवर कारवाई

Latest Marathi News Live Update: खार स्टेशनजवळ दोन इसम चालत्या ट्रेनमधून पडले

Baba Venga Prediction : इराण–इस्रायल–अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर बाबा वेंगा यांची भविष्यवाणी चर्चेत

SCROLL FOR NEXT