मुंबई

डफाच्या तालावर झुलली परंपरा

CD

डफाच्या तालावर थिरकला तांडा
टिटवाळ्यात बंजारा समाजाची पारंपरिक होळी

टिटवाळा, ता. ४ (वार्ताहर) : परंपरेचा साज, रंगांचा जल्लोष आणि ढोल-डफाच्या घुमणाऱ्या तालात झुलणारे नृत्य… अशा उत्सवी वातावरणात टिटवाळा तांडा (ता. कल्याण) येथे समस्त गोर बंजारा समाजाच्या वतीने पारंपरिक होळी आणि रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बदलत्या आधुनिक काळातही आपली संस्कृती आणि सांस्कृतिक अस्मिता जपण्याचा संदेश या सोहळ्यातून समाजबांधवांनी दिला.

सोमवारी (ता. २) नायक जयसिंग राठोड आणि कारभारी संतोष चव्हाण यांच्या उपस्थितीत विधिवत होळीपूजन करण्यात आले. रंगीबेरंगी पारंपरिक पोशाख आणि दागिन्यांनी नटलेल्या महिला व तरुणांनी डफाच्या तालावर पारंपरिक बंजारा नृत्य आणि ‘लेंगी’ सादर करत तांडा परिसर दुमदुमून टाकला. ज्येष्ठांनी या निमित्ताने तरुण पिढीला बंजारा संस्कृतीचे महत्त्व पटवून दिले. सामाजिक ऐक्य आणि बंधुभाव दृढ करणारा हा सोहळा समाजबांधवांच्या मोठ्या सहभागामुळे अधिक रंगतदार ठरला. पारंपरिक सण आणि सामूहिक नृत्यामुळे आमची सांस्कृतिक ओळख टिकून आहे. आधुनिक काळातही आमचा समाज आपल्या वारशाचे जतन करण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे उपस्थितांनी सांगितले.

रंगांची उधळण
मंगळवारी (ता. ३) रंगपंचमीच्या निमित्ताने टिटवाळा तांड्यात उत्साहाचे उधाण आले होते. लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनीच रंगांची उधळण करत आनंद साजरा केला. केवळ सण साजरा करणे हा उद्देश न ठेवता, समाजाची वेगळी ओळख आणि लोककला पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : पुणे जिल्ह्यात नराधमाचा अमानुषपणा! चिमुरडीच्या हत्येनंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; आरोपीला मिळणार मृत्यूदंडाची शिक्षा?

Latest Marathi News Live Update : कात्रज घाटात एसटी बंद पडल्याने भीषण ट्रॅफिक जॅम; वाहनांच्या ३-४ किमी लांब रांगा

IPL 2026: वैभव सुर्यवंशीला खतरनाक लूक देणाऱ्या जेमिन्सला शिक्षा! BCCI ची कारवाई

Bargi Dam Accident: क्रूझ कापून वाचवले जीव! मृतांच्या कुटुंबीयांना भेटून मुख्यमंत्री भावूक, बरगी धरण अपघातावर कठोर कारवाईची तयारी

Hasan Mushrif Statement : “गोकुळचा निकाल लागेल त्या दिवशी गुलाल लावूनच प्रतिक्रिया,” हसन मुश्रीफांनी शिवाजी पाटलांना थेट डिवचलं

SCROLL FOR NEXT