अंबरनाथ (वार्ताहर) : होळीच्या उत्साहात अंबरनाथ पूर्वेतील शिवगंगानगर परिसरातील परिमला सोसायटीत दोन विषारी कोब्रा साप आढळल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सर्पमित्राच्या तत्परतेमुळे दोन्ही सापांना सुरक्षित पकडून वनक्षेत्रात सोडण्यात आले. दुपारच्या सुमारास सोसायटीतील तरुण होळी खेळत असताना कचऱ्याच्या डब्याजवळ संशयास्पद हालचाल दिसली. जवळ जाऊन पाहिले असता दोन साप दिसले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रहिवाशांनी सुरक्षित अंतर राखले आणि तातडीने सर्पमित्र आकाश गोहिल यांना संपर्क साधला. गोहिलने पाहणी केली असता नर-मादी असे चार ते पाच फूट लांब दोन विषारी कोब्रा प्रजातीचे साप आढळले. अत्यंत सावधगिरीने अवघ्या दोन मिनिटांत दोन्ही सापांना सुरक्षितरित्या पकडले. त्यानंतर त्यांना जवळच्या वनक्षेत्रात सोडण्यात आले. या घटनेमुळे काही काळ सोसायटी परिसरात भीतीचे वातावरण होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.