आयपीएस अधिकाऱ्याच्या
पतीचा जामीन फेटाळला
मुंबई, ता. ४ : आयपीएस अधिकारी रश्मी करंदीकर यांचे पती पुरुषोत्तम चव्हाण यांना २४ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात जामीन फेटाळण्यात आला आहे. चव्हाण यांनी सुमारे २४ काेटी ७८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
सरकारी कोट्यातून कमी किमतीत भूखंड आणि फ्लॅट देण्याचे खोटे आश्वासन देऊन फसवणूक केल्याचे तपास यंत्रणेने सांगितले. याप्रकरणी चव्हाण यांना २० मे २०२५ला अटक करण्यात आली होती आणि सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
या वर्षी जानेवारीत न्यायालयाने त्यांचा जामीनअर्ज फेटाळला होता. गेल्या आठवड्यातही अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजित सोलापुरे यांनी चव्हाण यांचा जामीनअर्ज फेटाळला होता. बुधवारी उपलब्ध झालेल्या आदेशात दंडाधिकाऱ्यांनी आरोपपत्र आणि रेकॉर्डवरील इतर कागदपत्रे या गुन्ह्यातील आरोपींच्या भूमिकेस स्पष्ट करतात, असे म्हटले आहे.
चव्हाण यांच्या वकिलामार्फत आरोपपत्र आधीच दाखल करण्यात आले आहे आणि कागदोपत्री पुरावे गोळा करण्यात आले असल्याने आपल्या अशिलाला कोठडीत ठेवणे अनावश्यक असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्यांच्या याचिकेला विरोध केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.