महामार्गावर अपघातांचा धोका
तलासरी ते आमगाव यादरम्यान सेवा रस्त्यावर उघडी गटारे
तलासरी, ता. ५ (बातमीदार)ः मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत तलासरी ते आमगाव वरवाडा मार्गावरील सेवा रस्त्यावरील उघडी गटारे वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहेत. गटारांवर झाकण नसणे, संरक्षक रेलिंगचा अभाव तसेच इशारा फलक नसल्याने दुचाकीस्वार, पादचारी तसेच अवजड वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
तलासरी पुलालगतच्या सेवा रस्त्यावर अनेक ठिकाणी गटारे उघडी ठेवण्यात आली आहेत. कोणतेही झाकण बसवण्यात आलेले नसल्याने वाहनांचा अपघात होण्याची शक्यता आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे हा धोका अधिकच वाढला आहे. या मार्गावरून दररोज तलासरी एमआयडीसी परिसरातील विविध कंपन्यांमधील कामगार, युवक-युवती, व्यापारी तसेच रुग्णवाहिकांची ये-जा सुरू असते. त्यामुळे सेवा रस्त्यावरील उघडी गटारे भविष्यात मोठ्या दुर्घटनेला निमित्त ठरण्याची शक्यता आहे.
-------------------
रात्रीच्या वेळी मनस्ताप
- महामार्गाचे काँक्रीटीकरण करताना पूर्वीची गटारे तशीच ठेवली आहेत. पूर्वी रस्त्यापेक्षा उंच असलेली गटारे रस्त्याच्या पातळीवर आली असल्याने अधिक धोकादायक बनली आहेत. काही ठिकाणी गटारे पूर्णपणे उघडी असल्याने अपघाताला आमंत्रण देत आहेत.
- रस्त्याच्या कडेला संरक्षण जाळी बसवण्यासाठी अनेक ठिकाणी खड्डे खोदण्यात आले आहेत. मात्र, कोणतेही सूचनाफलक, दिशादर्शक चिन्हे किंवा इशारा दिवे लावण्यात आलेले नाहीत. परिणामी, रात्रीच्या वेळी वाहनचालकांना खड्डे ओळखणे कठीण होत आहे.
़़़़़ः------------------------
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत सर्व उघड्या गटारांवर मजबूत झाकण बसवावीत, आवश्यक त्या ठिकाणी संरक्षक रेलिंग उभारावीत तसेच इशारा फलक लावावेत अन्यथा अपघात घडून जीवितहानी झाल्यास त्यास महामार्ग प्राधिकरण पूर्णपणे जबाबदार राहील.
- सुनील इभाड, सामाजिक कार्यकर्ते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.