मुंबई

कर्करोग उच्चाटनाचा निर्धार

CD

कर्करोग उच्चाटनाचा निर्धार
पालघर जिल्ह्यात १७ हजार मुलींचे लसीकरण होणार
पालघर, ता. ५ (बातमीदार) ः महिलांमध्ये झपाट्याने वाढणाऱ्या गर्भाशय, मुखाच्या कर्करोगावर आळा घालण्यासाठी केंद्राने देशभरातील १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी ‘ह्युमन पॅपिलोमाव्हायरस’ (एचपीव्ही) लसीकरण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील १७ हजार १४ वर्षीय पात्र मुलींना ‘गार्डासिल’ ही लस मोफत देण्यात येणार आहे.
एचपीव्ही संसर्ग हा सर्व्हिकल कर्करोगाचा प्रमुख कारणीभूत घटक मानला जातो. वेळेत लसीकरण केल्यास या आजारापासून मोठ्या प्रमाणात संरक्षण मिळू शकते. त्यामुळे किशोरवयीन मुलींचे वेळेत लसीकरण हा प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय मानला जात आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. सर्व्हिकल कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात अनेकदा कोणतीही ठळक लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे तपासणी महत्त्वाची ठरते; मात्र आजार वाढल्यास मासिक पाळीच्या दरम्यान किंवा संभोगानंतर असामान्य रक्तस्राव, रजोनिवृत्तीनंतर रक्तस्राव, दुर्गंधीयुक्त किंवा जास्त प्रमाणात योनीस्राव, खालच्या पोटात किंवा श्रोणीप्रदेशात सतत वेदना, थकवा आणि अशक्तपणा अशी लक्षणे जाणवू शकतात. त्यामुळे कोणतेही लक्षण दिसल्यास तातडीने स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
------------------------------
प्रशासनाचे आवाहन
- एचपीव्ही लस शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच शाळांमार्फत उपलब्ध करून दिली जाणार आहे. पात्र मुलींनी संबंधित आरोग्य केंद्रात किंवा शाळेमार्फत नोंदणी केल्यानंतर लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
- या मोहिमेसाठी स्वतंत्र नियोजन करण्यात येत असून लसीकरण पार पाडण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाकडून ही लसीकरण मोहीम लवकरच सुरू करण्यात येणार असून मुलींना वेळेत लस देण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले आहे.
-------------------------
पालकांना आर्थिक दिलासा
एचपीव्ही लसीकरणामुळे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून ८५ टक्क्यांपर्यंत संरक्षण मिळू शकते. एचपीव्ही संसर्ग, असुरक्षित शारीरिक संबंध तसेच रोगप्रतिकारक शक्ती कमी असणे. ही या आजाराची प्रमुख कारणे मानली जातात. ‘गार्डासिल’ या एचपीव्ही लसीची बाजारातील किंमत तीन हजार ९२७ रुपये इतकी आहे; मात्र केंद्राच्या योजनेअंतर्गत पात्र मुलींना ही लस मोफत देण्यात येणार असल्याने पालकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
-----------------------------
सर्व्हिकल कर्करोग हा स्तनाच्या कर्करोगानंतर महिलांमध्ये आढळणारा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक सामान्य कर्करोग मानला जातो. भारतात दरवर्षी हजारो महिलांना या आजाराचे नव्याने निदान होते. एचपीव्ही लसीकरण सर्व्हिकल कॅन्सर टाळण्यासाठी अत्यंत सुरक्षित उपाय आहे.
- डॉ. संतोष चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी, पालघर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: मुंबई-ठाणे-कल्याण प्रवास सुसाट होणार! खाली रस्ता, मध्यभागी उड्डाणपूल आणि वर मेट्रो धावणार, जाणून घ्या संपूर्ण प्लॅन

T20 WC, IND vs ENG SF: भारत-इंग्लंड सामन्यासाठी वानखेडेवरील '७' नंबरची खेळपट्टी वापरली जाणार; २४ तासांत फिरला गेम... स्टेडियमवरून ताजे अपडेट्स

Latest Marathi News Live Update : एसटी चालक आणि वाहकांची अल्कोहोल तपासणी बंधनकारक

Kolhapur Wrestling : कोल्हापूरच्या मातीचा गाजणार पुन्हा एकदा जलवा; कुंभी कारखान्याच्या कुस्ती स्पर्धेत ५०० हून अधिक पैलवान उतरणार आखाड्यात

Beed News : गांजा तस्करीचे मोठे रॅकेट उघड? बर्दापूर पोलिसांची मोठी कामगिरी; मूर्ती फाट्याजवळ १० लाख ८०० रुपयांचा मुद्देमाल पकडला, तिघांना बेड्या

SCROLL FOR NEXT