मुंबई

बदलापूरमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी ‘भरोसा सेल’

CD

बदलापूर, ता. ५ (बातमीदार) : शहरातील महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलत बदलापूर पूर्व व बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यांत ‘भरोसा सेल’ सुरू करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे. पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांच्या आदेशानुसार हा सेल कार्यान्वित करण्यात येणार असून महिलांना तक्रार नोंदविणे आणि समुपदेशनासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध होणार आहे.
बदलापूर शहरात महिलांवर, विशेषतः अल्पवयीन मुलींवर होत असलेल्या अत्याचारांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना राबविण्याबाबत कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ठाणे ग्रामीण युवती अध्यक्षा प्रियंका आशीष दामले यांनी पुढाकार घेतला. त्यांनी पक्षाच्या नेत्या संगीता चेंदवणकर यांच्यासह काही दिवसांपूर्वी पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेत शहराच्या सुरक्षेशी संबंधित विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. याशिवाय लहान मुलांसाठी पूरक व सुसज्ज पोलिस ठाणे उभारणे, ‘सुरक्षित ठाणे’ मोहिमेच्या धर्तीवर ‘सुरक्षित बदलापूर’ मोहीम राबवून संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची गस्त वाढविण्याबाबतही चर्चा करण्यात आली. मागण्यांची दखल घेत पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी बदलापूर पूर्व व पश्चिम पोलिस ठाण्यांसाठी ‘भरोसा सेल’ स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांविरोधात प्रियंका दामले आणि संगीता चेंदवणकर यांनी सातत्याने आवाज उठवत न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

अडचणींचा मुद्दा
महापालिका होण्याच्या मार्गावर असलेल्या बदलापूरमध्ये महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वतंत्र महिला तक्रार निवारण केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली. शहरात महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ सुरू करणे, बदलापूर पश्चिम पोलिस ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागापासून दूर असल्यामुळे ते मध्यवर्ती ठिकाणी स्थलांतरित करणे आणि रात्री-अपरात्री तक्रार नोंदविताना महिलांना येणाऱ्या अडचणींचा मुद्दा यावेळी मांडण्यात आला.


तातडीचे आदेश
पोलिस उपनिरीक्षक आर. पी. बागुल, महिला पोलिस कर्मचारी एम. एम. खाडे आणि कविता धुमाळ यांना तात्पुरत्या स्वरूपात संलग्न करण्यात आले आहे. त्यांना बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात तत्काळ हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना उल्हासनगर येथील नियंत्रण कक्षातून कार्यमुक्त करून त्यांच्या हजेरीचा अहवाल सादर करण्यासही सांगितले आहे. या निर्णयामुळे बदलापूरमधील महिलांना तक्रारी नोंदविण्यासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध होणार असून, यातून सुरक्षेला अधिक बळ मिळणार असल्याचे मानले जात आहे.

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. यासाठी स्वतंत्र तक्रार निवारण केंद्र असावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून करत होतो. पोलिस आयुक्तांच्या सूचनेनंतर पोलिस उपायुक्तांनी बदलापूर पूर्व व पश्चिम पोलिस ठाण्यात ‘भरोसा सेल’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल पोलिसांचे मनापासून आभार मानतो.
- प्रियंका दामले, उपनगराध्यक्षा, बदलापूर नगरपालिका

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी पोलिस प्रशासन नेहमीच तत्पर आहे. वाढत्या तक्रारी लक्षात घेता उद्यापासून बदलापूर पूर्व व पश्चिम पोलिस ठाण्यासाठी ‘भरोसा सेल’ कार्यान्वित करण्यात येत आहे. या सेलचे केंद्र बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात असेल. महिलांना येथे तक्रारी नोंदविता येतील. घरगुती हिंसाचारासह विविध प्रकरणांमध्ये महिलांचे समुपदेशनही येथे करण्यात येणार आहे.
- सचिन गोरे, पोलिस उपायुक्त

बदलापूर : ठाणे ग्रामीण युवती अध्यक्षा प्रियंका दामले आणि पक्षाच्या नेत्या संगीता चेंदवणकर यांनी पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Purandar Airport: पुरंदर विमानतळासाठी ६० टक्के भूसंपादन; संमतिपत्रे सादर करण्यासाठी दोन दिवसांची मुदत, आतापर्यंत ९०० कोटी रुपयांच्या मोबदल्याचे वाटप

अभियांत्रिकी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना निवडता येतील 300 महाविद्यालये! प्रवेशासाठी लागणार ‘ही’ कागदपत्रे, जूनमध्येच प्रवेश नोंदणी, 4 प्रवेश फेऱ्या

Panchang 8 June 2026 : आजचे पंचांग! कालाष्टमी, मृग नक्षत्र प्रवेश आणि शुभ योग

साधे पोहे विसरा! वजन कमी करणाऱ्यांचा नवा फेव्हरेट ठरतोय हा 'फायबरयुक्त चिला'; जाणून घ्या सोपी रेसिपी

शेतकऱ्यांना आता ऑनलाईन बुकिंगशिवाय खते नाहीतच! आधार क्रमांक, जमीन, पिकाची माहिती, खतांची पोती, दुकानदार निवडावा लागणार; टोकनद्वारे 3 दिवसांत मिळेल खत

SCROLL FOR NEXT