मुंबई

मनसेचे यशवंत किल्लेदार

CD

यशवंत किल्लेदार बिनविरोध
जी उत्तर विभागाच्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी निवड
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ ः अत्यंत प्रतिष्ठेच्या दादर येथील जी उत्तर विभाग प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या उमेदवाराने माघार घेतल्यामुळे मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांची प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. या प्रभाग समितीच्या निमित्ताने ठाकरे बंधूंमध्ये अंडस्टॅन्डिग दिसून आले.

दादर विभाग हा मुंबईचे हार्ट म्हणून ओळखला जातो. शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठ असलेला विभाग. या विभागात मनसेचे नेते राज ठाकरे यांचे निवासस्थान आणि शिवसेना भवन आहे. मराठमोळा भाग म्हणून हा विभाग ओळखला जातो. या विभागातील जी-उत्तर प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी शिवसेना (ठाकरे) पक्षातर्फे जोसेफ कोळी आणि मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी अर्ज दाखल केल्यामुळे मुंबईचे लक्ष या समितीच्या अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीकडे लागले होते. ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती. मात्र अर्ज मागे घेण्याची मुदत संपण्याच्या १५ मिनिटे आधी नगरसेवक जोसेफ कोळी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे मनसेचे यशवंत किल्लेदार यांची जी-उत्तर प्रभाग समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
मुंबई महापालिकेतील सहा प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका आज झाल्या. त्या बिनविरोध झाल्या. इतर प्रभाग समित्यांममध्ये कोणतीही प्रतिस्पर्धी उमेदवारी दाखल केली नसल्याने औपचारिकता म्हणून अध्यक्षपदांच्या नावांची घोषणा झाली.

प्रभाग समित्यांवर बिनविरोध निवड
सांताक्रूझ येथील एच-पूर्व/पश्चिम : रोहिणी कांबळे (शिवसेना ठाकरे पक्ष), अंधेरी येथील के-पश्चिम : रोहन राठोड (भाजप), अंधेरी पश्चिंम येथील के-दक्षिण/के-उत्तर : प्रकाश मुसळे (भाजप), गोरेगाव पश्चिम येथील पी-दक्षिण : श्रीकला पिल्ले (भाजप), ना. म. जोशी मार्ग येथील जी-दक्षिण : पद्मजा चेंबूरकर (शिवसेना ठाकरे, दादर येथील जी-उत्तर : यशवंत किल्लेदार (मनसे).
-----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Prices : इराण-अमेरिका युद्धाचा थेट फटका! गॅस सिलिंडर महाग; आजपासून नवे दर लागू, किती झाली किंमत?

अग्रलेख : उजेडातील रोषणाई!

मोठी बातमी! पहिली ते नववीची अंतिम सत्र परीक्षा २० एप्रिलपासून; शिक्षक-विद्यार्थ्यांना ४४ दिवसांची उन्हाळा सुट्टी; १५ जूनपासून सुरु होणार शाळा

Weekend Special Recipe: नवीन काहीतरी खायचंय? मग वीकेंडला बनवा चविष्ट मुगदाळीची बाटी, सोपी आहे रेसिपी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ७ मार्च २०२६ ते १३ मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT