पालिका रुग्णालयातील अन्नपदार्थांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
डॉक्टर, परिचारिकांच्या आरोग्याबाबत स्थायी समितीत सदस्य आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ ः नायर रुग्णालयातील निवासी परिचारिका आणि अनिवासी परिचारिकांना दिले जाणारे अन्नपदार्थ निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यावरून आज स्थायी समिती सदस्य आक्रमक झाले.
पालिकेच्या नायर रुग्णालयातील ३०० निवासी परिचारिका आणि ८२६ अनिवासी परिचारिकांना दोन वेळचे जेवण-नाष्टा पाच रुपये ४५ पैशांत मिळतो. याचा अर्थ अन्नपदार्थाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. हाॅटेलमध्ये नाष्टा करण्यास गेलो तरी १०० रुपये कुठे जातात कळत नाही, तर एवढ्या कमी पैशांत जेवण-नाष्टा कसा देणार, असा सवाल स्थायी समिती सदस्य अमेय घोले यांनी उपस्थित केला. दरम्यान, निवासी परिचारिका व अनिवासी परिचारिकांना नाॅनव्हेज जेवणात चिकन, मटण, फिश करी, भुर्जी, मिसळ पाव, इडली-सांबार या अन्नपदार्थांचा समावेश आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांनी स्थायी समितीच्या बैठकीत दिली; मात्र सर्वपक्षीय सदस्यांनी पालिकेच्या रुग्णांलयातील दयनीय स्थितीचा पाढा वाचत प्रशासनावर जोरदार टीका केली.
नायर रुग्णालयातील निवासी परिचारिका विद्यालयातील विद्यार्थिनींसाठी भोजन व्यवस्था करण्यासाठी सुमारे ३.१४ कोटी रुपयांचे कंत्राट देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. या योजनेनुसार सुमारे ३०० निवासी परिचारिका विद्यार्थिनींना प्रतिदिन ८१ रुपयांत अल्पोपाहार, दोन वेळचे जेवण व पेय देण्यात येणार आहे. ८१ रुपयांत दोन वेळचे जेवण-नाष्टा याचा अर्थ अन्नपदार्थाच्या दर्जावर काँग्रेस नगरसेविका अंजता यादव यांनी प्रश्न उपस्थित करीत उपाहारगृहात उंदीर फिरत असतात, त्यामुळे उपाहारगृहात अस्वच्छता पसरलेली असते, अशी विदारक स्थिती त्यांनी मांडली. अखेर अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांनी अन्नपदार्थाच्या दर्जाबाबत माहिती दिल्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी प्रस्ताव मंजूर केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.