मुंबई

पाण्यासाठी नगरसेवकांचा स्थायी समिती आक्रोश

CD

पाण्यासाठी नगरसेवकांचा स्थायी समितीत आक्रोश
ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईने मुंबईकर बेजार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ ः उंच आणि सखल भागात अत्यंत कमी दावाने पाणीपुरवठा होत असल्याने पाण्यावाचून मुंबईकरांचे हाल सुरू आहेत. पाण्याच्या वितरण व्यवस्थेवर सर्वपक्षीय नगरसेवकांनी जोरदार प्रहार करीत स्थायी समितीत पाण्यासाठी आज आक्रोश केल्याचे दिसले. प्रशासक राजवटीत बोलता येत नव्हते. आज नगरसेवकांनी पाण्यासाठी प्रशासनाला थेट जबाबदार धरले. जल अभियंत्यासोबत लवकरच बैठक बोलावून पाणीप्रश्न सोडवू, अशी ग्वाही स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी बैठकीत दिली.

बोरिवली टेकडी जलाशय दोन आणि तीन या जलाशयांचा दुरुस्तीचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी आला होता. या कामासाठी फेमस्ट्रक्ट कन्सलटिंग इंजिनिअर्स एलएलपी यांची नेमणूक केली आहे. त्यांच्या सेवा शुल्काचे अधिदान करण्याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी आला होता. या प्रस्तावावर बोलताना स्थायी समितीत सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. सर्व पक्षीय सदस्यांनी आपापल्या विभागातील कमी दाबाने होत असलेल्या समस्येचा पाढा वाचत प्रशासनाला धारेवर धरले. जलाशयाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

किल्लेदार यांनी माडली कैफियत
दादर या विभागात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे या भागातील नागरिक हैराण झाले आहेत. स्थानिक महिला अक्षरशः त्रस्त आहेत. नळाला लावलेल्या पाइपचे पाणी तोंडाने ओढावे लागत असल्याची कैफियत मनसेचे सदस्य यशवंत किल्लेदार यांनी माडली. दादरसारख्या मध्यवर्ती भागात अशी अवस्था असेल, तर इतर भागात कशी असेल, असा सवाल त्यांनी केला.

गारगई मार्गी लावू
मुंबईत पाणीप्रश्न तीव्रतेने भेडसावतोय. ही गंभीर समस्या आहे. त्याबाबत प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा. पालिकेच्या जल अभियंत्यासोबत तातडीने स्थायी समितीची बैठक बोलवावी. तसेच गारगई धरणाच्या परवानग्या राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या समन्वयाने सोडवून हा प्रकल्प मार्गी लावू, त्यामुळे पाणीप्रश्न सुटू शकेल, अशी ग्वाही स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिली.

-------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्ट संतापलं! आदेश न पाळणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा, उशिरा अपीलही चालणार नाही

Donald Trump : एपस्टीन फाईल्सचा दुसरा पार्ट! डोनाल्ड ट्रम्पनी १५ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याचा आरोप, अमेरिका सरकारने कागदपत्रे केली सार्वजनिक

Pune News : आशासेविका मानधनाविना; तब्बल दोन हजार महिलांना पाच महिन्यांपासून निधी नाही

Latest Marathi News Live Update : शेवटची गोळी आणि सैनिक असेपर्यंत आम्ही लढणार; इराणचे उपपरराष्ट्रमंत्री सईद खतीबजादेह यांचा ठाम निर्धार

Success Story: शेतकऱ्याच्या मुलाची भरारी; अजित देशमुख यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड

SCROLL FOR NEXT