संरक्षक भिंतीच्या बांधकामावर हातोडा
वाडा, ता.७(बातमीदार)ः सिद्धेश्वर नदीच्या किनाऱ्यालगत बांधलेल्या संरक्षक भिंतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केल्याचे विधानपरिषदेत आमदार अनिल परब यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या बांधकामावर नगरपंचायतीने शुक्रवारी ( दि.६) हातोडा उगारला आहे.
वाडा नगरपंचायतीमार्फत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सिद्धेश्वर बंधाऱ्यालगतच्या नदी किनाऱ्याला संरक्षक भिंतीचे काम हाती घेण्यात आले आहे. बांधकाम करताना ठेकेदाराने लोखंडी सळ्यांएेवजी दगडांचा वापर केला होता. त्यामुळे ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी विधानपरिषदेत बांधकाम निकृष्ट असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात १० मार्च पर्यंत उत्तर देण्याच्या सूचना नगरपंचायत प्रशासनाला करण्यात आली होती. पण त्यापूर्वीच प्रशासनाने तातडीने बांधकाम तोडण्याची कारवाई सुरु केली आहे.
दरम्यान, बांधकामासंदर्भात ठेकेदाराला नोटीस बजावली होती. त्यामुळे आता तोडण्याची कारवाई केल्याचे नगर अभियंता भूषण घनवट यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.