मुंबई

“स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट बदलापूर घडवणे हेच ध्येय” — नगराध्यक्षा रुचिता घोरपडे!

CD

स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट बदलापूर घडवणे हेच ध्येय
नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांचा निर्धार
बदलापूर, ता. ७ (बातमीदार) ः कुळगाव-बदलापूर नगर परिषदेची निवडणूक प्रशासकीय राजवटीनंतर तब्बल सहा वर्षांनी पार पडली असून, महिलांच्या ओबीसी आरक्षणामुळे पुन्हा एकदा नगरसेवक ते नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद असल्याची भावना नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी व्यक्त केली. ही संधी म्हणजे केवळ पद नाही तर एक सक्षम महिला म्हणून बदलापूरसाठी काम करण्याची मोठी जबाबदारी आहे, असे त्या म्हणाल्या. शहराच्या विकासासाठी प्रशासनाला शिस्त लावून नागरिकाभिमुख कामे करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काळात बदलापूरमध्ये नियोजनबद्ध विकास साधत प्रशासन अधिक कार्यक्षम करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट बदलापूर घडवण्याच्या दिशेने पायाभूत सुविधा मजबूत करणे, नाट्यगृह, सांस्कृतिक भवन, सायन्स पार्क आणि क्रीडा संकुल यांसारखे मोठे प्रकल्प राबविण्याचा मानस असल्याचे त्यांनी नमूद केले. महिलांचे आरोग्य, शिक्षण आणि स्वावलंबन या बाबींवर अधिक भर देत शहरात महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
यंदा नगराध्यक्ष पदासाठी महिला आरक्षण लागू झाल्याने भाजपच्या उमेदवार म्हणून रुचिता घोरपडे या मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या. एक सक्षम महिला म्हणून कुटुंबाची जबाबदारी आणि सामाजिक कार्य यांचा समतोल राखत त्यांनी ही नवी जबाबदारी स्वीकारली आहे. महिला दिन हा केवळ औपचारिक उत्सव नसून, महिलांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा दिवस आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

राजकीय प्रवास प्रेरणादायी
रुचिता घोरपडे यांचा राजकीय प्रवासही प्रेरणादायी आहे. २००५मध्ये त्यांनी नगरसेवक पदाची पहिली निवडणूक लढवली होती. बदलापूरमध्ये सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणाऱ्या पहिल्या नगरसेविका ठरल्या. २००५ पासून ते २०२५ पर्यंत (कोरोना काळ वगळता) सलग चार वेळा नगरसेविका म्हणून काम करीत त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला.

गर्भसंस्कार केंद्र आणि ‘सुकन्या योजना’
१. महिलांच्या आरोग्य आणि सक्षमीकरणासाठी पालिकेमार्फत काही महत्त्वाचे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे घोरपडे यांनी स्पष्ट केले. बदलापूर शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागात गर्भवती महिलांसाठी ‘गर्भसंस्कार केंद्र’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
२. ‘नगराध्यक्ष सुकन्या योजने’अंतर्गत ८ मार्च २०२६ पासून बदलापूर शहरात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावावर कुळगाव-बदलापूर नगर परिषदेतर्फे पाच हजार रुपयांची मुदत ठेव करण्यात येणार आहे.
३. याशिवाय महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वर्षभर घराघरात जाऊन आरोग्य तपासणी मोहीम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: न्यायालयीन कामकाजाचा न्यायमूर्तींच्या आरोग्यावर परिणाम, कामाच्या ताणाबाबत उच्च न्यायालयाची टिप्पणी

मालिकाविश्वात 'या' अभिनेत्याचा दमदार कमबॅक ! आनंदी मालिकेत दिसणार वयाने मोठा नवरा आणि तरुण बायकोची कथा ?

Lord Krishna Descendants : कोण आहेत श्रीकृष्णाचे वंशज? आता कुठे राहतात अन् कशी परिस्थिति आहे..पाहा

Nagpur: धार्मिक प्रतीकांवरून धर्मांतर ठरू शकत नाही; ठोस पुरावे आवश्यक, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Eknath Shinde : नाशिकमध्ये योग्य वेळी सगळं योग्य होईल! एकनाथ शिंदेंचे राजकीय संकेत; येवल्यात शिवसेनेची ताकद वाढली

SCROLL FOR NEXT