मुंबई

विद्याभवनच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाला सुरुवात

CD

विद्याभवनच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाला सुरुवात
पन्नास वर्षांच्या शैक्षणिक वाटचालीचा गौरव; सांस्कृतिक कार्यक्रमाने रंगत
घाटकोपर, ता. ११ (बातमीदार) : पुणे विद्यार्थिगृहाच्या विद्याभवन घाटकोपर शाखेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमांचा शुभारंभ बुधवार (ता. ४) शाळेच्या प्रांगणात उत्साहात पार पडला. ५० वर्षांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक योगदानाचा गौरव करणारा हा सोहळा दिमाखात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून मुंबईच्या महापौर रितू तावडे उपस्थित होत्या. त्यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेत संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्ये उत्तम संस्कार, मूल्ये आणि सामाजिक जाणीव रुजवून आदर्श नागरिक घडवण्याचे कार्य विद्याभवन करत असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्याध्यक्ष राजेंद्र बोऱ्हाडे यांनी संस्थेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेत पुढील विकास आराखड्याविषयी माहिती दिली. तसेच संस्थेचे माजी कार्याध्यक्ष के. एन. शिरकांडे यांचे मनोगत त्यांच्या पत्नी कल्पना शिरकांडे यांनी वाचून दाखवले. याप्रसंगी संस्थेची ४९ वर्षांची वाटचाल चित्रफितीद्वारे सादर करण्यात आली. सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित संगीत संध्येमुळे कार्यक्रमाला सांस्कृतिक रंगत लाभली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TET पेपरफुटी प्रकरणी पहिली कारवाई, भिवंडीतून तीन आरोपींना अटक; पेपर लीक करणारे हात नेमके कुणाचे?

Gadchiroli: किराणा दुकानांत धान्यासह पेट्रोल, डिझेलचीही विक्री;नागरिकांच्या जिवाशी खेळ; जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत सुरक्षा नियमांकडे होतेय दुर्लक्ष

Mumbai News: ऑफर पडली महागात! ग्राहकांच्या गर्दीने शोरूमला सेल रद्द करण्याची वेळ; इन्फिनिटी मॉलमध्ये गोंधळ

TET चा पेपर नेमका कसा फुटला? भिवंडीत काय घडलं? परीक्षा अचानक रद्द; राज्य परीक्षा परिषदेचं पत्र आलं समोर

Latest Marathi News Live Update : राज्यातील शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, ठाकरे गटाची मागणी

SCROLL FOR NEXT