जंगलामुळे पोटापाण्याची सोय
फुले, बिया, वनस्पती विक्रीतून आदिवासींना रोजगार
जव्हार, ता. ८ (बातमीदार) ः मुसळधार पाऊस पडणाऱ्या भागात जंगलात अनेक औषधी वनस्पती, झाडे, वनौपज संपत्ती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. या वनसंपदेमुळे आदिवासी रोजगाराचे साधन निर्माण झाले असून जीवनावश्यक वस्तूंच्या बदल्यात पैसे घेऊन विक्री करीत आहेत.
पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वनसंपत्ती आहे. विक्रमगड, जव्हार, मोखाडा, तलासरी, डहाणू, वाडा तालुके आदिवासीबहुल तालुके असल्याने जंगल भागात राहणारे आदिवासी कुटुंबे जंगलातून विविध झाडांपासून मिळणारी फळे, फुले, बियांच्या विक्रीतून संसारगाडा चालवतात. साग, निलगिरी, अकेशिया, काजू, गुंज, मोह, चिंच, करंज, सीताफळ, डिंक, सागरगोटे, रिठा, बावा सुकवलेली मोहफुलांच्या विक्रीतून रोजगार मिळवतात.
---------------------------
जव्हार तालुक्यात आठवडा बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून जंगलातील वनधन खरेदी केले जाते. व्यापारी मिरची पावडर, डाळी, कांदा, बटाटा देत असतात. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा पैशांचा व्यवहार होत नाही.
- वंदना दरोडा, माजी सरपंच
-----------------------------
जंगली वनस्पतींची काही फुले, बिया नाशवंत असल्याने साठवण फायदेशीर ठरते. आदिवासींनी जंगलातून गोळा केलेल्या विविध वनस्पतींच्या बिया, फुले यांची खरेदी आदिवासी विकास महामंडळाकडून झाल्यास एक शाश्वत रोजगार उपलब्ध होईल.
- कल्पेश राऊत, सरपंच
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.