मुंबई

कलानगरी पर्यटनाचे केंद्र

CD

कलानगरी पर्यटनाचे केंद्र
जूचंद्र गावाचा पालिका विकास करणार; रोजगारनिर्मितीवर भर

वसई, ता. ८ (बातमीदार) ः पालघर जिल्ह्यातील नायगाव येथील जूचंद्र गाव रांगोळीतील कल्पकतेमुळे कौतुकाची थाप मिळवत आहेत. बोलक्‍या रांगोळ्यांतून गावाचा नावलौकिक दूरवर पोहोचला आहेत. त्यामुळे गावाचे वेगळपण जपताना पर्यटनाचे नवे केंद्र करण्याचा महापालिकेचा मानस आहे.
नायगाव पूर्वेकडील जूचंद्र गावातील आगरी समाज कलाप्रेमी आहे. नाटक, भजन, कुस्ती, रांगोळीच्या रंगांकडे आकर्षित होत असलेली तरुण पिढीने समाजप्रबोधनात मोलाचा हातभार लावला आहे. त्यांच्या मेहनतीला पालिका साथ देणार असून रांगोळीचे गाव म्हणून ख्याती सर्वदूर पोहोचवण्यासाठी
रांगोळीने सजलेले प्रवेशद्वार, सेल्फी पॉइंटसह पर्यटकांसाठी व्यवस्था असलेले दालन उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून जूचंद्र गावातील कला जगभरात पोहोचवताना रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट आखले आहे. त्यामुळे भविष्यात शब्दांशिवाय बोलके गाव विविध पैलू रांगोळीतून उलगडणार आहेत.
---------------------------------------
रांगोळीच्या विविध प्रकारांची मांडणी
- वसई-विरार महापालिका याठिकाणी कलादालन उभारणार असून रांगोळीतील नवनवीन कलाविष्कार मांडले जाणार आहेत. याबाबतचा आराखडा महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी तयार केला असून स्थापत्य रचनाकार नेमला जाणार आहे.
- या कलादालनात रांगोळी कलाकारांचा ठिपक्‍यांची रांगोळी, पोट्रेट, भौमितिक रांगोळी, संस्कार भारती, थ्रीडी, व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे, एम्बॉस रांगोळी, पाण्यावरील रांगोळी, पाण्याखालील रांगोळी, अल्ट्रा व्हायोलेट रांगोळी रेखाटण्यात येणार आहेत.
--------
कलादालनातील वैशिष्ट्ये
रांगोळीचा इतिहास दर्शवणारी माहिती
प्रशिक्षण केंद्र
रांगोळी प्रदर्शन दालन
रांगोळी दर्शन बस
वाहनतळ व्यवस्था
सेल्फी पॉइंट
प्रवेशद्वार
वॉकिंग टूर
रांगोळी विक्री केंद्र
--------
वसई-विरार शहरात पर्यटनस्थळांचा विकास व्हावा, यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नायगाव जूचंद्र रांगोळीचे गाव संकल्पना आहे. या माध्यमातून रोजगार, व्यवसाय, पर्यटनवाढीला हातभार लागेल.
- मनोजकुमार सूर्यवंशी, आयुक्त
-----------
वसई-विरार शहर पालिका क्षेत्रातील जूचंद्र गाव कला क्रीडा क्षेत्रात अग्रेसर आहे. या गावात रांगोळी दालन सुरू केले जाणार आहे. त्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून रांगोळीचे विविध प्रकार सातासमुद्रापार पोहोचणार आहेत.
- अजीव पाटील, महापौर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Sarpanch Missing : जंगलात सापडले जळालेले अवशेष, त्यांच्या मागे तोंडाला मास्क घालून बसलेली 'ती' व्यक्ती कोण? पाटगावचे माजी सरपंच आहेत तरी कुठं? घातपाताचा संशय

Nagpur News: खोलीत सापडला ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह; नारातील धक्कादायक घटना, परिसरात खळबळ

"माझं करिअर सासरच्या लोकांमुळे घडलं" सासू-सासऱ्यांबद्दल मराठी अभिनेत्री व्यक्त; 26 व्या झालेलं नवऱ्याचं निधन

Latest Marathi News Live Update : वाशिम जिल्ह्यात विद्युत वाहिनीच्या तारे मधून घर्षण होऊन 2 एकर गहू पिकाची राखरांगोळी

भारताच्या विजयात आमचाही वाटा...बाहेर बसून, खेळाडूंना पाणी पाजलं, नेट्समध्ये गोलंदाजी केली; मोहम्मद सिराजचा मजेशीर Video Viral

SCROLL FOR NEXT